इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू या तिन्ही धर्माचा भारतीय उपखंडातील प्रवेश दक्षिण भारतातील केरळ प्रांतातून झाला. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रत्यक्ष शिष्यांपकी सेंट थॉमस ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने केरळच्या किनारपट्टीवरील मुझिरिस म्हणजे सध्याचे कोडुंगलूर येथे इ.स. ५२ मध्ये आला. त्याच्या तिथे येण्यापूर्वी काही ज्यू लोक आधीच त्या भागात स्थायिक झाले होते. थॉमसने त्या भागातील पालायार, कोडुंगलूरवगरे आठ ठिकाणी चच्रेस स्थापन करून ख्रिस्ती धर्मप्रसाराची केंद्रे सुरू केली. इ.स. ७२ मध्ये चेन्नईजवळच्या सध्याच्या सेंट थॉमस माऊंट येथे त्याची हत्या झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेंट थॉमसने ख्रिस्ती धर्माची दीक्षा (बाप्तिस्मा) दिलेल्या लोकांची संख्या वाढत गेली. सेंट थॉमस हा सीरियन ख्रिस्ती धर्मपीठाचा धर्मोपदेशक असल्यामुळे त्याने दीक्षा दिलेल्या ख्रिस्ती धर्मीयांना ‘सीरियन ख्रिश्चन्स’, ‘सेंट थॉमस ख्रिश्चन्स’ किंवा ‘नसरानी ख्रिश्चन्स’ असे संबोधण्यात येते. सीरियन ख्रिश्चन पंथीयांची संख्या अधिकतर केरळातच आढळते. सीरियन ख्रिश्चन धर्मपंथाचे हे भारतातले ख्रिश्चन या परकीय धर्माचे पहिले अनुयायी.  पुढे मध्यपूर्वेतल्या आणि आफ्रिकन देशांमधून आलेले ख्रिश्चन लोक आणि धर्मातर केलेले ज्यू धर्मीय यांनीही सीरियन धर्मपंथाचा स्वीकार केला. केरळातल्या या सीरियन ख्रिस्ती लोकांचे वैशिष्टय़ म्हणजे यांच्या जीवनशैलीवर तिथल्या स्थानिक हिंदू परंपरांचा पडलेला प्रभाव हे आहे. हिंदूंच्या काही स्थानिक परंपरा पाळणाऱ्या या सीरियन ख्रिश्चनांचे सर्व व्यवहार मल्याळी भाषेतच चालतात. धर्मग्रंथही मल्याळी भाषेत अनुवादित केलेले येथे वाचले जातात. या समाजातील अनेक लोकांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजाचे नाव मोठे केले आहे. भूतपूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी, भारतातील उच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश अ‍ॅना चांदी, प्रसिद्ध मल्याळी कवी के.व्ही.सायमन, ख्रिस्ती धर्मोपदेशक साधू कोचुंजु उपदेशी हे सर्व सीरियन ख्रिश्चन होत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christianity religion in india
First published on: 26-01-2018 at 00:31 IST