साध्या विणीचा वापर वेगवेगळ्या तऱ्हेच्या कापडांसाठी केला जातो तेव्हा त्या कापडाचा वापर कशासाठी केला जाणार यानुसार त्याच्या स्वरूपात बदल केले जातात. वीण मात्र साधीच असते. साध्या विणीच्या समतोल कापडामध्ये ताणा आणि बाणा एकाच सूतांकाचा वापरला जातो. तसेच ताण्याची आणि बाण्याची घनताही एकसारखीच असते. त्यामुळे हे कापड वरून आणि खालून सारखेच दिसते. अर्थात फिनििशग करताना कापडाच्या एकाच बाजूवर प्रक्रिया करतात. ती बाजू त्या कापडापासून कपडे शिवताना बाहेरची बाजू म्हणून वापरतात.
साध्या विणीच्या असमतोल कापडामध्ये ताणा आणि बाणा यांचा सूतांक एकसारखा असतोच असे नाही. तसेच ताण्याची घनता आणि बाण्याची घनता एकसारखी असेलच असे नाही. यामुळे असे कापड वरच्या आणि खालच्या बाजूने एकसारखे दिसत नाही. जेव्हा ताण्याला प्राधान्य देणारे कापड तयार करतात तेव्हा ताण्याची घनता बाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. तसेच ताण्याचा सूतांक हा बाण्याच्या सूतांकापेक्षा तलम असतो. यामुळे ताण्याचा एक प्रकारचा वरचष्मा या कापडात असतो. (वार्प) त्याचा परिणाम म्हणून ताण्याच्या दिशेने हे कापड जास्त आटते. याउलट जेव्हा बाण्याला प्राधान्य देणारे कापड तयार करतात तेव्हा बाण्याची घनता ताण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. तसेच बाण्यावरचा ताण हा ताण्यावरील ताणापेक्षा कमी असतो. या प्रकारचे कापड बाजारात कमी प्रमाणात आढळते. कारण हे कापड तयार करायला जास्त वेळ लागतो म्हणून याचा खर्च वाढतो, परिणामी याचा दर जास्त होतो.
साध्या विणीचे एक सर्वदूर माहीत असलेले कापड म्हणजे ‘केम्ब्रिक’ बेल्जियममधील कॅम्ब्रथी या ठिकाणी हे कापड प्रथम तयार झाले. त्यामुळे त्याला केम्ब्रिक या नावाने संबोधले जाते. मध्यम दर्जाच्या सूतांकाचे सूत वापरून याची निर्मिती केली जाते. ताण्याचा सूतांक हा बाण्याच्या सूतांकाएवढाच किंवा थोडा कमी असतो. म्हणजे ताणा ३० सूतांकाचा असेल तर बाणा ३५ सूतांकाचा. त्याचबरोबर ताण्याची घनता आणि बाण्याची घनता यामध्ये फरक असतो. हा फरक तीन ते चार प्रति सें.मी. इतकाच असतो. इथेसुद्धा बाण्याची घनता जास्त आणि ताण्याची कमी असे प्रमाण वापरले जाते. शìटगसाठी हा कापडाचा प्रकार नेहमी वापरला जातो.

– सतीश भुटडा (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर

electricity units how to check
महिन्याचं वीज बिल कशाप्रकारे मोजलं जातं माहितीये का? तुम्ही स्वतः मोजू शकता, कसं ते जाणून घ्या…
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

किशनगड राज्यस्थापना

‘मार्बल सिटी’ म्हणून सध्या ओळखले जाणारे राजस्थानमधील अजमेर शहरापासून चोवीस कि.मी. अंतरावर असलेले किशनगढ शहर हे ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे संस्थान होते. जोधपूरचे राजे उदयसिंहजी याच्या बारा मुलांपकी दुसरा मुलगा किशनसिंह याने इ.स. १६०९ मध्ये या राज्याची स्थापना केली. किशनसिंह पूर्वी या प्रदेशात सामोखान सिंह याचे राज्य होते. अकबराशी झालेल्या युद्धात सामोखानचा पराभव झाल्यावर अकबराने त्याच्या नातवाला कैदेत ठेवले. अकबराला किशनसिंहने युद्धात मदत केल्यामुळे अकबराने त्याला ३०० जाट आणि १५०० स्वारांची मनसबदारी दिली आणि मोगल फौजेत सेनाधिकाऱ्याचा हुद्दा दिला. पुढे अकबराने िहदवान, सेयोला आणि किशनगढ हे परगाणे त्याला इनाम दिल्यावर किशनगढ ही राजधानी करून किशनसिंहने इ.स. १६०९ ते १६१५ असा कारभार केला.
किशनसिंहनंतरचे साहसमल, जगमलसिंह, रूपसिंहजी वगरे राज्यकत्रेही स्वत:चे राज्य सांभाळून मोगलांची मनसबदारी करीत होते. मानसिंहजी या राजाने औरंगजेबाचा सेनापती झुल्फिकार खानाच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. जिंजीच्या किल्ल्यात मराठा छत्रपती राजाराम असताना मोगलांच्या सन्याने वेढा घातला होता, त्यात मानसिंहजी प्रमुख होता.
कल्याणसिंह या राजाने २६ मार्च १८१८ रोजी ईस्ट इंडिया कंपनीबरोबर संरक्षण करार केला. १९०१ साली २२१० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या किशनगढ संस्थानाची लोकसंख्या नव्वद हजार होती आणि ब्रिटिश राजवटीने या राज्याला १५ तोफसलामींचा बहुमान दिला.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com