scorecardresearch

जागतिकीकरणानंतर वस्त्रोद्योग

विकसनशील व अविकसित देशांतील बाजारपेठांमध्ये पुन्हा प्रवेश करून त्या काबीज करण्यासाठी विकसित देशांनी जागतिकीकरणाचा डाव आखला.

नव्वदीच्या दशकामध्ये देशांच्या बाजारपेठांच्या जागतिकीकरणाबद्दल विचार सुरू झाला. यामध्ये अमेरिका व युरोपमधील विकसित देशांचा विशेष पुढाकार होता. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे इ.स. १९४०-५० नंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेले अनेक देश स्वतंत्र झाले. हे देश स्वतंत्र होण्यापूर्वी या देशांच्या बाजारपेठांमध्ये युरोपमधील देशात तयार होणारा माल विकला जात असे व या व्यापारावर त्या देशातील उद्योग चालत असत; परंतु स्वातंत्र्यानंतर बहुतेक देशांनी आपल्या देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयातीवर बंदी घातली किंवा जबर आयात कर बसविले. यामुळे अमेरिका, युरोप व इतर विकसित देशांतील उद्योगांची या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांतील बाजारपेठ संपुष्टात आली. हळूहळू या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांपकी काही देशांनी औद्योगिक विकास करण्यावर भर दिला व हे देश विकसनशील देश म्हणून ओळखले जाऊ लागले. भारत हा या विकसनशील देशांच्या यादीतील एक प्रमुख देश ठरला.
विकसनशील व अविकसित देशांतील बाजारपेठांमध्ये पुन्हा प्रवेश करून त्या काबीज करण्यासाठी विकसित देशांनी जागतिकीकरणाचा डाव आखला. जागतिकीकरणाचा प्रमुख उद्देश हा सर्व देशांनी आपल्या बाजारपेठा खुल्या कराव्यात व कुठल्याही देशातील उत्पादने जगातील दुसऱ्या कुठल्याही देशांच्या बाजारपेठांमध्ये खुलेपणाने विकता यावीत असा होता. कुठलाही देश सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण नसतो. खनिज तेलाच्या बाबतीत तर भारतासह अनेक देश दुसऱ्या देशांवर अवलंबून आहेत. म्हणून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भाग न घेणाऱ्या देशांना वाळीत टाकावे व इतर देशांनी अशा देशांशी कुठलेही संबंध ठेवू नयेत असे ठरविण्यात आले. यामुळे भारतासारख्या देशांना जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेत सहभागी होण्यावाचून गत्यंतर नव्हते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील उद्योगांना संरक्षण दिल्यामुळे देशातील उद्योगांचा विकास झाला. या संरक्षण प्रक्रियेमध्ये देशातील उद्योगांना आपल्या बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योगांबरोबर स्पध्रेपासून संरक्षण मिळाले.
 यामुळेच जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर भारतीय उद्योगाला मोठय़ा प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागले.

संस्थानांची बखर: १८५७ च्या स्वातंत्र्यसमराविरुद्ध भोपाळ!
भोपाळ संस्थानात नवाब सिकंदर जहान बेगमचा अंमल असताना भोपाळ शेजारच्या इंदोर, महू, नीमच इत्यादी ठिकाणी १८५७ च्या बंडाची तयारी चालू होती. या भागातून बंडखोर भोपाळ मध्ये येऊन भूमिगत sam04होण्याच्या तयारीत आहेत याची कुणकूण बेगमला लागली होती. भोपाळमध्येही काही मुस्लीम बंडखोर मशिदींमध्ये दडून बसले होते. या भोपाळी बंडखोरांचा काल्पीचे तात्या टोपे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, टोंकचे नवाब यांच्याशी संपर्क होता आणि त्यांच्यासाठी रोख रक्कम, घोडे, शस्त्रे जमवून त्यांना पुरविण्याचे काम भूमिगत राहून हे बंडखोर करीत.
 या बंडखोरांचे पाठीराखे एकमेकांना चपात्या पाठवून त्यांच्यामधून गुप्त संदेश पाठवीत. सिकंदर बेगमने त्यामुळे आपल्या राज्यात चपात्या नेण्या-आणण्यास बंदी घातली!
 मौलवी अब्दुल कयाम या पोलीस ठाणेदाराने कानपूरहून आलेली पाचशे पत्रके गुप्तपणे भोपाळ मध्ये वितरित केली. ब्रिटिश राजवट, िहदू आणि मुस्लीमांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बंडात सहभागी व्हा, अशा अर्थाचे आवाहन त्यात होते. हा मौलवी पकडला जाऊन त्याची सर्व मालमत्ता जप्त केली गेली.
भोपाळ संस्थानात ब्रिटिशांच्या तनाती फौजेचे ६०० घोडदळ आणि ५०० पायदळ होते. सहा ऑगस्ट १८५७ रोजी भोपाळ जवळील सेहोर कँटोन्मेंटमध्ये शिपायांचे बंड सुरु झाल्याचे जाहीर झाले. तिथे बंडखोरांनी सरकारी खजिना लुटून दोन लाख रुपये गोळा केले. १८५७  चे शिपायांचे बंड दडपण्यासाठी सिकंदर बेगमने ब्रिटिश अधिकार्याना सर्व प्रकारची मदत केली.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2015 at 12:27 IST

संबंधित बातम्या