पावसाळ्याला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा पहिल्या पावसाच्या सरी बरसतात आणि वातावरणात मातीचा एक वेगळाच गंध पसरतो. हा वास काही पावसाच्या थेबांचा नसतो तर अनेक रसायनांच्या मिश्रणाचा तो वास असतो. या वायूंच्या मिश्रणात ओझोन वायूचा समावेश असतो. वातावरणाभोवतीचा संरक्षक थर हा ओझोन वायूचा असतो. विजेच्या चमचमाट होतो तेव्हा हवेतील ऑक्सिजनचे (ड2) ओझोनमध्ये (ड3) रूपांतर होते. कोरडय़ा हवामानात पाऊस येतो तेव्हा जो वास सुटतो त्याला ‘पेट्रीकोर’ असे संबोधितात. ‘पेट्रीकोर’ हा शब्द ज्या गंधासाठी वापरतात तो गंध ‘जिओस्मिन’ या रेणूपासून येत असतो. ‘जिओस्मिन’ हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ ‘पृथ्वीचा वास’ असा आहे. हा वासयुक्त रेणू स्ट्रिप्टोमायसेस या जीवाणूत आढळतो. हे जीवाणू मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरातून हा रेणू उत्सर्जति होत असतो. हा रेणू एकप्रकारे बायसायक्लिक अल्कोहोल असून त्याचे रासायनिक सूत्र  उ12ऌ22ड  असे आहे. मानवी नाकाला या रेणूचा वास ५ पी.पी.एम (दशलक्षांश भाग) इतक्या कमी पातळीवर जाणवू शकतो. अन्नात जिओस्मिनचे अस्तित्व असेल तर तो अन्नाची चव बिघडवतो. बीटसारख्या पदार्थात तसेच गोडय़ा पाण्यातील माशात या रेणूचा अंश असतो. हे अन्न शिजविताना त्यात आम्लीय घटक वापरले तर जिओस्मिन वासरहित होते.
पावसाच्या सरीनंतर येणारा वास हा केवळ ओझोन आणि जिओस्मिनमुळेच येतो असे नव्हे तर तो सुगंध वनस्पती तेलापासूनसुद्धा येतो. हा संशोधकांना लागलेला नवा शोध आहे. पावसाआधीच कोरडय़ा वातावरणात काही वनस्पती तेलाचा अंश मुक्तकरतात. ती तेले सभोवतालच्या मातीत किंवा चिकणमातीत शोषली जातात. ही तेले जमिनीत पडलेल्या बियांचे रुजणे थोपविण्यासाठी असतात. अपुऱ्या पाण्याअभावी जर बिया रुजल्या तर त्यांची वाढ नीट होऊ नये, ही त्यामागची नसíगक योजना असते. हुंगावासा वाटणारा पहिल्या पावसानंतर येणारा मातीच्या वासाची ही पाश्र्वभूमी होय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा: दोघे जा, एकटा ये..
‘‘जाताना दोघं जा, येताना मात्र एकटा ये.. निश्चय कर की एकटाच परत येशील..’’ गुरू ओलान्द आनंद म्हणाले. (भंते आनंद मूळचे डच, आता ३७-३८ वर्षे श्रीलंकेत तिथेच राहतात.) मी चक्रावलो. माझ्याबरोबर आणखी एखादा साधक येत असावा आणि त्याला स्वगृही अथवा इच्छित स्थळी नीट पोहोचवून परत ये, असं त्यांना सुचवायचं असावं, असं म्हणून गप्प राहिलो.
नियोजित वेळ झाली तरी पॅगोडा सेंटर (आश्रम) मध्ये कोणी आलेलं नव्हतं. ‘‘निघ आता,’’ भंते आनंद म्हणाले. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून मिस्कील हसत म्हणाले, ‘‘आहात तुम्ही बरोबरच दोघे! गेले काही दिवस बघतोय, तुझं मन भरकटतंय. ते कुठे फिरायला जातं, तुझं तुला ठाऊक. तुझं शरीर मात्र स्वस्थ डोळे मिटून बसलेलं असतं. तुझं मन आणि शरीर दोघं एकमेकांबरोबर नसतात. म्हणून मी म्हटलं दोघं जाताय, पण ‘एक’ होऊन परत या..’’
असं म्हणून जोरात हसले. किंचित वरमल्यासारखं वाटून, मी खाली पाहू लागलो. त्यावर त्यांनी खांद्यावर हात ठेवून भानावर आणलं.
मला एकटय़ानं पुढचा प्रवास करायचा होता. त्यांनी सांगितलेल्या स्थळी पोहोचलो तेव्हा सकाळ होत होती.
मोठा रम्य परिसर होता.
उत्तर श्रीलंकेतील (आता सुरक्षित असलेलं) अरण्य. दूर टुरिस्टांना आकर्षित करणारी वनश्री होती, पण मला तिथे राहायचे नव्हते. त्याच्या साधक सन्मित्रानं बांधलेलं छोटंसं घरकुल होतं. आसपास पशू-पक्ष्यांच्या आवाजाखेरीज काही नव्हतं. हवं, नको ते बघायला माळी होता. बाकी फक्त जंगल आणि मी. यापूर्वी निसर्गपुत्र असल्याचा अनुभव गाठीला होता. त्यामुळे साधनेची प्रक्रिया कठीण वाटली नाही. मनात वारंवार भीती, सर्व पाश तुटल्याचे विचार डोकावत होते. भीती मावळता मावळता आणखीही काही भावना दाटून आल्या. एक प्रकारचा एकटेपणा वाटला. आपण आता ‘अ‍ॅट द मर्सी ऑफ नेचर’ आहोत असं वाटून असाहाय्य वाटलं. माझी डेस्टिनी माझ्या ताब्यात नाही; असंही वाटलं. हे सगळं बोलावंसं वाटल्यामुळे स्वत:शी मोठय़ानं बोलू लागलो. बोलून दमल्यावर कुठून कोण जाणे खूप दाटून आलं. मनात दु:खाचे कढ आले. बसल्याबसल्या अश्रुधारा वाहात होत्या. कसलं रडू येतंय? कसलं दु:ख होतंय कळेना? पुन्हा विचारात पडलो.. हे इथेच थांबवावं आणि निघावं. मग वाटलं हे अश्रू, हे भावनांचे आवेग इथे सोडून यायचं, माझ्या उत्कट जाणिवांना मागे टाकून यायचं..?
शरीराकडे पाहावं, तर पायांना लागलेली रग निवळत होती. हातापायाला आलेली बधिरता विरत होती. श्वासही स्थिरावल्यासारखा मंद नियमित होत होता. मनाचं तंत्र तसंच भरकटत होतं. मग ठरवलं, शरीराकडे बघतो तसंच मनाकडे बघावं.. रडणं, वाईट वाटणं, अस्वस्थपणा, चलबिचल सगळ्या अनुभवांकडे पाहू लागलो. वाटलं हे सारं आपोआप उद्भवणारे आणि आपोआप निवणारे तरंग आहेत. मी फक्त त्याकडे पाहावं, जसं वाटतंय, तसं वाटू द्यावं.. कधी तरी संध्याकाळ झाली. दिवस मावळत होता तेव्हा मी भानावर आलो. ते (शरीर) होतं तिकडेच स्तब्ध आणि मनही विश्रब्ध, शांत!
गुरू आनंद आश्रमाच्या दारात स्थिर नजरेनं वाट पाहात होते. मी त्यांच्यासमोर उभा.. ‘‘ये, एकटाच आलेला दिसतोयस!’’
 वेलकम होम! आपल्या मनाला पोरकं करून कुठे भटकतोस रे.. मला तेव्हा त्यांच्या नजरेत दिसली ती करुणा होती.
डॉ.राजेंद्र बर्वे

प्रबोधन पर्व: विकासाभिमुख आणि व्यवहारी अर्थतज्ज्ञ
महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आणणाऱ्या, विकासाला दिशा देणाऱ्या आधारस्तंभांपकी एक प्रमुख नाव म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ. गाडगीळांनी वैकुंठभाई मेहतांसारख्या ज्येष्ठ सहकाऱ्याबरोबर काम करत राज्यातील ‘सहकारा’चा पाया घातला. डॉ. गाडगीळ यांचा १९३६ पासूनच सहकाराशी संबंध आला. १९४४ साली भारत सरकारने गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली शेतीकर्जाबाबत अभ्यास करण्यासाठी एक उपसमिती नेमली होती.  ग्रामीण विकासाचे सर्वागीण प्रश्न सविस्तरपणे यात त्यांनी मांडले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या तारणावर कर्ज दिले जात असे. तारणाऐवजी कारणावर कर्ज देण्याचा क्रांतिकारक विचार डॉ. गाडगीळ यांनी या देशात प्रथम राबविला. थेट लोकांमध्ये जाऊन ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ जाणून घेण्यात त्यांना रस होता. तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण होती, पण त्यावर फक्त लेखन आणि विचारमंथन न करता त्या प्रश्नांची तड लावण्यासाठी काही तरी कृती करण्यात ते सहभागी असत. अनेक क्षेत्रांत चौफेर मुशाफिरी केली.
 देशाच्या नियोजनात शेती, सहकार, शिक्षण, उद्योग आणि आरोग्य यांना प्राधान्य देऊन दीनदलितांच्या विकासाच्या विविध योजना साकार करणाऱ्या डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी चळवळीला आयाम दिला, सूत्रबद्ध विचार दिला. याशिवाय आपले लेखन कटाक्षाने मराठीतून करण्याचा प्रयत्न केला. ‘ध. रा. गाडगीळ लेखसंग्रह’ (खंड १ व २) या नावाने त्यांचे मराठीतील समग्र लेखन गोखले अर्थशास्त्र संस्थेने १९७३ साली प्रकाशित केले. संयुक्त महाराष्ट्र का असावा याची मांडणी गाडगीळ यांनी १९४१ सालीच केली होती, तर १९२७ साली पुणे विद्यापीठ कसे असावे याविषयी सविस्तर लेख लिहिला होता. पुढे १९६६-६७ मध्ये त्यांनी या विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवले. भारताच्या आíथक सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या बहुविध समस्यांना सामोरे जाणे कसे आवश्यक आहे हे गाडगीळ यांच्या लेखनातून स्पष्ट होते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geosmin smell of rain
First published on: 23-06-2014 at 01:01 IST