भारतातील दगडी कोळशाचे महत्त्वाचे साठे सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाले; तेव्हा नुकतेच एक हिमयुग होऊन गेले होते. त्यानंतर हवामान उष्ण आणि दमट होऊ लागले होते. ते वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने त्या कालखंडात अपुष्प वनस्पतींचा एक नवा समुदाय उत्क्रांत झाला. सपुष्प वनस्पती अस्तित्वातच नसल्याने कोणी सशक्त स्पर्धकही नव्हते. त्यामुळे अपुष्प वनस्पती वृक्षासारख्या उंच वाढत होत्या. त्यातल्या सर्वात जास्त फोफावलेल्या प्रजातीचे नाव ग्लॉसॉप्टेरिस असल्याने या वनस्पतीसमुदायाला ‘ग्लॉसॉप्टेरिस समुदाय’ म्हणतात.

याच सुमारास तीन खचदऱ्या निर्माण झाल्या. त्यातून तीन नव्या नद्या वाहू लागल्या. आज आपण त्यांना दामोदर, महानदी आणि गोदावरी या नावांनी ओळखतो. या नद्यांच्या दोन्ही तीरांवर ग्लॉसॉप्टेरिस वनस्पतीसमुदायाची घनदाट जंगले माजली होती. त्यामुळे उन्मळून पडलेली झाडे, तुटलेली लाकडे, पानेफुले हे सारे वनस्पतीजन्य डबर पाण्याबरोबर वाहत जाऊन या नद्यांमध्ये साठणाऱ्या गाळाचा हिस्सा बनत राहिले.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?

जसजसा गाळ साचत गेला, तसतसे गाळाचे वजन वाढून तिन्ही खचदऱ्या आणखी खचत जाऊन पुन्हा पुन्हा खोल होत राहिल्या. त्यामुळे अधिकाधिक गाळ साठायला मदत झाली. इतकेच नव्हे तर गाळ वाहून गेला नाही, टिकून राहिला. गाळाच्या काही थरांमध्ये वनस्पतीजन्य डबराचे प्रमाण प्रचंड होते. भवताली असलेला चिखल आणि गाळातील आम्लधर्मीय पाणी यामुळे ते जैव विघटनापासून बचावले.

कालांतराने गाळांच्या या थरांवर नव्या कालखंडातले थर साचू लागले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे खोल जाऊ, तसतसे तापमान वाढू लागते. आधीचे थर खूप खोलवर गाडले गेल्याने त्यातील वनस्पतीजन्य डबरातील जैव पदार्थाचे तापमान वाढू लागले. गाळांच्या नवनव्या थरांमुळे त्यांच्यावरचा दाबही वाढला. आम्लधर्मीय पाण्यामुळे वनस्पतीजन्य डबराभवती ऑक्सिजनचा मात्र अभाव होता. साहजिकच, वनस्पतीजन्य डबरामधील जैव पदार्थाचे क्षपण (रिडक्शन) होऊन त्यातील नायट्रोजन, हायड्रोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांचा ऱ्हास झाला. आणि त्या थरांमध्ये कार्बन तेवढा मागे उरला. अतिशय मंद गतीने चालणाऱ्या या प्रक्रियेला कार्बनीभवन म्हणतात. या प्रक्रियेला लाखो वर्षे लागतात. या प्रक्रियेमुळेच  वनस्पतीजन्य डबराच्या थरांपासून दगडी कोळशाचे प्रस्तर निर्माण होत असतात. भारतातील राणीगंज, झारिया आणि इतर सर्वच महत्त्वाची कोळसाक्षेत्रे या खचदऱ्यांमुळेच निर्माण झाली आहेत.

– डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org