डॉ. नंदिनी विनय देशमुख, मराठी विज्ञान परिषद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाममधील ‘मिसिंग’ या आदिवासी जमातीत १९६३ मध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या सोळा-सतराव्या वर्षांपासून सातत्याने वनीकरण करणाऱ्या जादव मोलाई पायेंग यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. याच नावाचा त्यांच्याविषयीचा लघुपट २०१३ मध्ये आला, तर २०१५ मध्ये या कामाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली. माजुली जंगलात वन-कामगार असणाऱ्या पायेंग यांनी गेल्या काही दशकांत ब्रह्मपुत्र नदीच्या वालुकामय किनाऱ्यावर इतकी झाडे लावून जगवली की आसाममधील जोऱ्हाट जिल्ह्याचा कोकिळामुख भाग संपूर्ण जंगलमय झाला आहे. या मानवनिर्मित जंगलाला ‘मोलाई जंगल’ म्हटले जाते. एकूण ५५० हेक्टरवर वसलेले हे जंगल त्यांनी १९७९ पासून लावायला सुरुवात केली होती. एकदा या प्रदेशात खूप मोठय़ा संख्येने मेलेले साप त्यांनी पाहिले. मोठा पूर ओसरून गेल्यानंतर पसरलेल्या उष्णतेमुळे हे साप मरून पडले होते. त्या वेळी त्यांनी बांबूची वीस रोपे या वालुकामय प्रदेशावर लावली आणि नंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने त्यांनी ‘अरुणाचापोरी’ नावाच्या भागात २०० हेक्टरवर झाडे लावायला सुरुवात केली. त्या वेळी ते केवळ एक मजूर होते. बाकीचे मजूर काम संपल्यावर निघून गेले, परंतु हे तेथेच थांबून झाडांची काळजी घेऊ लागले आणि स्वत:च्या कल्पनेनुसार आणखी झाडे लावू लागले.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal jadav molai payeng assam forest man of india ysh
First published on: 07-10-2022 at 00:02 IST