गणिती किंवा सांख्यिकी प्रारूपे ही कोणत्याही सॉफ्टवेअरचा पाया असतात. संभाषण आकलनात अगदी सुरुवातीला डायनॅमिक टाइम वार्पिग (डीटीडब्ल्यू) हे प्रारूप (मॉडेल) वापरले जात असे. बोलण्याचा वेग कमी झाला किंवा वाढला तरी आकलनाची अचूकता कायम राखण्यास हे प्रारूप मदत करीत असे. कालांतराने हिडन मार्कोव्ह मॉडेल (एचएमएम) या प्रारूपाने डीटीडब्ल्यू प्रारूपाची जागा घेतली. हे सांख्यिकी प्रारूप आणि त्याच्याबरोबर इतर गणिती तंत्रे संभाषण आकलनात वापरण्यास सुरुवात झाली. याचा सोपेपणा आणि त्याला प्रशिक्षण देण्यातील सुलभता यामुळे हे प्रारूप मोठय़ा प्रमाणात वापरले गेले.

१९८०च्या सुमाराला संभाषण आकलनाच्या क्षितिजावर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क (एएनएन) तंत्राचा उदय झाला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र-अध्ययनाच्या शाखेने या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली. फोनीम वर्गवारी, शब्द आकलन, दृकश्राव्य फितीतील भाषा आकलन इत्यादी अनेक कामांमध्ये यांचा वापर सुरू झाला. याच्या सुधारित आवृत्ती म्हणजे ‘डीप फीडफॉरवर्ड अँड रिकरंट न्यूरल नेटवर्क’ तंत्रज्ञान. याचा उपयोग साधारणपणे २०१० पासून सुरू झाला. या यंत्र-अध्ययन तंत्रज्ञानाने न्यूरल नेटवर्कची प्रशिक्षण क्षमता प्रचंड प्रमाणात वाढली.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal foundations of conversational comprehension amy
First published on: 20-03-2024 at 00:10 IST