जगभरात अनेक ठिकाणी समुद्रात प्रवाळ भित्तिका आढळतात, त्यापैकी ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ किंवा भारतातील अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप येथील प्रवाळ भित्तिका (कोरल रीफ्स) सर्वज्ञात आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे सर्वात जास्त परिणाम होणारी परिसंस्था म्हणूनदेखील याकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या महत्त्वाच्या प्रजाती वाढीव तापमानामुळे पांढुरक्या पडत आहेत. त्यालाच ‘कोरल ब्लिचिंग’ असे म्हटले जाते. समुद्री परिसंस्थांपैकी प्रवाळांची परिसंस्था महत्त्वाची मानली जाते, कारण येथे विविध प्रकारचे सागरी जीव आश्रयासाठी येतात. तसेच काही मत्स्य प्रजाती प्रजननासाठी येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाळाच्या काही जातींपासून फार पूर्वीपासून लाल रंगांची रत्ने तयार केली जात होती. काही स्त्रिया अशा प्रवाळ अलंकाराचा नित्य वापर करतात. त्यांचा वापर केल्याने आरोग्य सुधारते असाही समज आहे. तसेच प्रवाळ-भस्म आयुर्वेदिक औषधांत वापरले जात असे. अलीकडच्या काळात प्रवाळापासून निरनिराळी जैवक्रियाशील संयुगे मिळू शकतात, हे लक्षात आले आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal information about coral reefs species threats to coral reefs zws
First published on: 06-06-2022 at 02:11 IST