एक्सएआय (एक्स्प्लेनेबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ही प्रणाली मज्जातंतूंच्या जाळय़ाच्या निर्णयप्रक्रियेवर आधारित आहे. या प्रणालीद्वारे विविध कालावधींसाठी हवामानाचा अंदाज मिळवला जातो.

हाय-रेझोल्युशन असणारी हवामानाच्या अंदाजाची जागतिक प्रणाली (ग्लोबल हाय रेझोल्युशन अ‍ॅट्मॉस्फिअरिक फोरकािस्टग सिस्टम- जीआरएएफ) ही अत्याधुनिक प्रणाली हवामानाच्या घटकांच्या निरीक्षणांची मोठय़ा प्रमाणातील विदा वापरून यंत्र शिक्षणाद्वारे हवामानाचा कमी कालावधीचा अचूक अंदाज तयार करते. महासंगणकावरील ग्राफिक प्रोसेसिंग युनिटवर चालणारी, पॅरलल प्रोसेसिंगद्वारे असंख्य क्रिया एकाच वेळी पाच ते सहापट जास्त वेगाने करणारी व दर तासाने स्वत:ला अद्ययावत करणारी ही जगातील पहिली प्रणाली आहे.

Loksatta kutuhal Nils John Nielsen
कुतूहल: निल्स जॉन निल्सन
loksatta kutuhal sense of smell and artificial intelligence
कुतूहल : गंधज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
loksatta kutuhal melting points of minerals
कुतूहल : खनिजांचे वितळणबिंदू
Artificial Intelligence on Fire
कुतूहल : अग्निवापराच्या इतिहासाचा मागोवा…
loksatta kutuhal beethoven last symphony finished with the help of artificial intelligence
कुतूहल : बीथोवनची सिंफनी
Loksatta editorial A unilateral ceasefire proposal by Russian President Vladimir Putin Ukraine
अग्रलेख: मतैक्याचे मृगजळ..
Loksatta kutuhal Maculochpitts neuron Intelligence
कुतूहल: मॅक्युलोचपिट्स न्यूरॉन
Loksatta kutuhal Accurate forecasting of weather with the help of multi models
कुतूहल: बहुप्रारूपांच्या साहाय्याने हवामानाचा अचूक अंदाज

अमेरिकेतील ‘एनव्हिडिया’ आणि चीनमधील ‘हुआवी’ या कंपन्यांनी हवामानाच्या अंदाजासाठी आपापली स्वतंत्र प्रारूपे निर्माण केलेली आहेत. गूगलने तयार केलेले मेटनेट नावाचे प्रारूप २०२० पासून वापरले जात आहे. ‘गूगल डीपमाईंड’चे ‘ग्राफकास्ट’ हे प्रारूप कमी क्षमतेच्या वैयक्तिक संगणकावरही सक्षमतेने व जलदपणे काम करते. त्यासाठी महासंगणकाची गरज नसते. ‘गूगल डीपमाईंड’ आणि ‘गूगल रिसर्च’ यांनी ९० मिनिटांपर्यंतचा अतिअल्पकालीन म्हणजे सद्यकालीन हवामानाचा अंदाज तयार करणारी प्रणाली तयार केली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये ‘मेटनेट-३’ ही  प्रणाली स्थानिक हवामानाचा २४ तासांसाठीचा अचूक अंदाज तयार करते. लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘क्लायमॅक्स’ या मूळ प्रारूपावर पृथ्वीच्या हवामानसंबंधीच्या अनेक प्रारूपांची कामे केली जातात. युरोपीय अंतराळ संस्थेच्या प्रायोजित प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विकसित केलेल्या पृथ्वीच्या आभासी (व्हच्र्युअल ) प्रारूपाचा उपयोग नैसर्गिक आपत्तींचे नकाशे तयार करणे, आपत्तींचा इशारा देणे व त्यांचे मूल्यांकन करणे, जलस्रोतांचे व त्यांच्या वापराचे व्यवस्थापन करणे, इत्यादींसाठी करण्याचे उद्दिष्ट आहे.

या सर्व प्रणालींद्वारे नैसर्गिक व मानवनिर्मित हवामानबदल व तीव्र हवामानाचा इशारा, बचावासाठी घेण्याची काळजी यासंबंधीची माहिती मोबाइल फोनवर योग्य वेळी पाठवून जनतेला सावध करून नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळणे किंवा कमी करणे शक्य होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हवामान अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. याचा उपयोग आपल्या देशाचा आर्थिक कणा असणाऱ्या मोसमी पावसाच्या अंदाजांतील अचूकता वाढविण्यासाठी होईल. – अनघा शिराळकर,मराठी विज्ञान परिषद