वैशाली पेंडसे-कार्लेकर  vaishali.karlekar1@gmail.com

सध्याच्या वृत्तपत्रांवर सहज नजर टाकली तर ‘फक्त एक स्पून रोज’ किंवा ‘लक्झुरियस फ्लॅट अव्हेलेबल’, ‘शो फ्लॅट रेडी’ अशा भाषेत लिहिलेल्या बऱ्याच जाहिराती नजरेस पडतात. जास्तीत जास्त इंग्रजी शब्द वापरले तरच आपली जाहिरात ग्राहकाला नीट समजेल, या समजुतीतून मराठी जाहिराती दिवसेंदिवस इतक्या इंग्रजी होत चालल्या आहेत, की काही काळाने मराठी जाहिरात म्हणजे केवळ देवनागरी लिपी एवढंच लक्षण उरेल की काय अशी भीती वाटते.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

आज आपण जाहिरात क्षेत्राच्या कामकाजात वापरले जाणारे काही महत्त्वाचे शब्द पाहू. जाहिरातीच्या मुख्य घटकांमध्ये येते हेडलाइन; तिला ‘शीर्षओळ’ किंवा ‘मथळा’; सबहेडलाइनला ‘उपमथळा’ किंवा ‘उपओळ’; बॉडीटेक्स्ट किंवा कॉपीला ‘मजकूर’, ‘संहिता’; स्लोगन किंवा कॅचलाइनला ‘घोषवाक्य’ आणि लोगोला ‘बोधचिन्ह’ असे शब्द पुस्तकांत सापडतात, मात्र ते पुस्तकाबाहेर वापरल्याचं जाणवत नाही. जाहिरातीसाठी संगीताचा साज चढवून ऐकवल्या जाणाऱ्या सिग्नेचर टय़ूनला ‘संकेतधून’ आणि जिंगलसाठी ‘गीतिका’ हे सुंदर शब्द एका गटचर्चेत पुढे आले.

जाहिरात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला यूएसपी (युनिक सेिलग पॉइंट) याला ‘अनन्य विक्री मुद्दा’ किंवा ‘अविमु’ म्हणता येईल. इंग्रजीत असं आद्याक्षरं वापरून लघुरूपं करण्याचं प्रमाण जास्त आहे. आपणही ‘भावना पोचल्या’ सांगण्यासाठी मराठीत ‘भापो’ करतो, तसंच मराठीतल्या मोठय़ा शब्दाचं किंवा शब्दसमूहाचं असं लघुरूप करूनही प्रचारात आणता येईल. जाहिरात जगतातला एक प्रतिष्ठित प्रकार म्हणजे ब्रॅण्ड अर्थात ‘नाममुद्रा’. ही नाममुद्रा जनमानसात ठसवणारा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणजे ‘जाहिरातदूत’. कॅम्पेनसाठी ‘जाहिरातमोहीम’ तर मुख्य जाहिरातीआधी छळून उत्सुकता वाढवणारे टीझर यांना ‘छळक’ म्हटले तर मराठी ‘‘छळ’ आठवणार. या शब्दात फारच छळ वाटला तर ‘पूर्वरंग’ म्हटले तर कीर्तन आठवणार. मग काय शब्द तयार करू शकतो आपण? वाचकहो, तुम्ही सुचवाल का? खरं तर ‘जाहिरात’ या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर मराठी जाहिरातदार आहेत, जाहिराती तयार करणारे चित्रकार, लेखक मराठी आहेत आणि मुख्यत: या जाहिराती मराठी लोकांसाठी लिहिल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रातल्या सर्व सर्जनशील मराठी व्यक्तींनी जाहिरातींत जाणीवपूर्वक सढळ हस्ते सुयोग्य मराठी शब्द लिहिण्याचं मनावर घेतलं, तर त्यांना मराठी ग्राहकांकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. अशा जाहिराती वैशिष्टय़पूर्ण तर ठरतीलच, शिवाय भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनेही मोलाच्या ठरतील. जाहिरातींमध्ये इंग्रजी शब्दांऐवजी वापरता येणारे असेच काही मराठी शब्द पाहू पुढच्या लेखात.