धातूची पोकळ नळी पाण्यात बुडवून आजूबाजूच्या बोटींचा सुगावा लागतो असा शोध १४९० मध्ये लिओनाडरे द विंचीने लावला होता. पण पाण्याखालील अडथळय़ांची माहिती करून घेण्याची निकड भासली ती १९१२ साली टायटॅनिकच्या जलसमाधीनंतर. त्यानंतर समुद्रात खोलवर वास्तव्य व संचार असणाऱ्या पाणबुडीलाही मार्गदर्शकाची गरज भासू लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गात अशा अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्या आपल्या मार्गक्रमणासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी आपल्या आवाजाच्या प्रतिध्वनीचा उपयोग करतात. डॉल्फिन, देवमासा आणि वटवाघळं तर आपल्या सगळय़ांच्या परिचयाची. वटवाघूळ आपल्या घशाच्या स्नायूंच्या साहाय्याने एका सेकंदात साधारण १६० ते १९० वेळा आवाज करते आणि परावर्तित होऊन परत येणाऱ्या ध्वनिलहरींच्या साहाय्याने आपल्या आजूबाजूच्या परिसराचा नकाशा मांडते, आपले भक्ष्य शोधते व अडथळे टाळून मार्गक्रमण करते. वटवाघूळ असंख्य आवाजांतून आपला आवाज तर ओळखतेच, पण भोवताली असलेल्या कीटकांचा आकार, पोत, अंतर, दिशा इत्यादी गोष्टींचे ज्ञानही त्यांना होते. या ध्वनिलहरींची वारंवारिता २० किलोहर्ट्स (ङऌ९) पेक्षा जास्त असल्याने आपण त्या ऐकू शकत नाही. 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metal hollow tube of nature and of man titanic akp
First published on: 03-02-2022 at 00:04 IST