चंगेज खानाचा नातू बातु खान याच्या मंगोल साम्राज्यातील वायव्य मंगोलियातील प्रदेशात त्याने १२३२ साली स्थापन केलेली खानेत म्हणजे सुभ्याचे राज्य होते. ही खानेत गोल्डन होर्ड या नावाने ओळखली जाई. बातु खान आणि त्याच्या पुढच्या वारसांनी पूर्व युरोप, झारचे साम्राज्य, पश्चिम आशियातल्या तत्कालीन राजसत्तांवर हल्ले करून गोल्डन होर्डचा आणि पर्यायाने मंगोल साम्राज्याचा मोठा विस्तार केला. इ.स. १५०२ नंतर ही खानेत अनेक तुकडय़ांमध्ये विभागली गेली. इ.स. १३८० पर्यंत गोल्डन होर्ड हे इतके प्रबळ होते की रशियाचा झार त्यांना खंडणी देत होता आणि तत्कालीन मास्को, कीव्हसारख्या शहरात हे गोल्डन होर्डचे म्होरके वेळोवेळी जाऊन लुटालूट करीत. पुढे मंगोल प्रदेशावर सतराव्या शतकात मांचुरियाच्या क्विंग साम्राज्याने आक्रमण करून दक्षिण मंगोलियाच्या प्रदेशावर कब्जा केला. तेव्हापासून दक्षिण मंगोलियाला इनर मंगोलिया असे नाव झाले, तर उत्तरेकडील प्रदेशाला आऊटर मंगोलिया म्हटले जाऊ लागले. क्विंग सत्तेने आऊटर मंगोलियाही ताब्यात घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्विंग घराण्याची सत्ता विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कोसळली आणि १९१९ साली आऊटर मंगोलिया चिनी साम्राज्याच्या अमलाखाली आला. क्विंग घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित करताना मंगोलियात बऱ्याच ठिकाणी सरंजामशाही होती. क्विंग राजांनी या सरंजामदारांना हाताशी धरून हा प्रदेश घेतला आणि त्यांचेच वर्चस्व प्रशासनातही राहिले. या काळात तिथे येणारे चिनी व्यापारी आणि सरंजामदार यांनी मनमानी करून स्वत:चा फायदा करून घेतला. मंगोल लोकांमध्ये तत्पूर्वी वस्तू व्यापाऱ्यांकडून विकत घेताना त्याचा मोबदला कोंबडी, मेंढी, घोडासारखे प्राणी देऊन करीत, तसेच शासक त्यांचे करसुद्धा हे प्राणी घेऊन जमा करीत. परंतु क्विंग सत्ताकाळात फक्त चांदी किंवा तांबे या धातूंच्या मोबदल्यानेच सर्व व्यवहार सुरू झाले. त्यामुळे मंगोल जनतेची परिस्थिती हलाखीची झाली. त्या काळात आऊटर मंगोलियात लहानमोठे ७०० बौद्ध मठ म्हणजे मोनेस्ट्री होत्या आणि त्यामध्ये १२ हजार बौद्ध भिख्खू राहत होते. बौद्ध जनता आणि सरंजामदारांच्या आश्रयाने कार्यरत असलेल्या या बौद्ध मठ आणि तेथील अनुयायांनाही क्विंग काळात त्यांचे कार्य करणे असह्य़ झाले.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mongol empire after genghis khan history of mongol ruler golden horde zws
First published on: 17-11-2021 at 03:51 IST