लंडनच्या टेम्स नदीवर  न्यू ब्रिज ते टॉवर ब्रिज पर्यंतच्या पल्ल्यात एकंदर २४ पूल आहेत. त्यापकी ‘लंडन ब्रिज’ हा सर्वात जुना. त्याने मध्ययुगीन इतिहासातल्या अनेक महत्त्वाच्या घटना पाहिल्यामुळे आपल्या इतिहासाचा एक साक्षीदार म्हणून लंडनकरांचा जिव्हाळ्याचा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आक्रमक रोमन सन्याने इंग्लंडमध्ये प्रवेश केल्यावर टेम्स नदी पार करण्यासाठी तरंगता पूल तयार केला. पुढे इसवीसन ५५  मध्ये रोमनांनीच हा तात्पुरता पूल काढून त्याजागी लाकडी पूल उभारला. हा पहिला लंडन ब्रिज!

या पुलाच्या दक्षिण टोकाला जी वस्ती झाली ती साऊथवार्क, दुसऱ्या बाजूच्या वस्तीचे नाव  ‘लोंडिनियम’. हेच मूळ लंडन.

या लाकडी पुलावरून घोडे, माणसे आणि घोडागाडी यांची रहदारी चाले. ११७६ साली हेन्री  द्वितीयने, आगीत भस्मसात झालेला लंडन ब्रिज पाडून  त्याजागी नवीन दगडी पूल बांधावयास घेतला. १२०९ साली हा नवा दगडी लंडन ब्रिज वापरास सुरुवात झाली. हा दगडी पूल पुढची सहाशे वष्रे अव्याहतपणे त्याचे काम करीत होता. या काळापर्यंत लंडनचे महत्त्व वाढले होते.

लंडनचा केंद्र िबदू झालेल्या या लंडन ब्रिजचे वैशिष्टय़ म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूंवर कठडय़ांच्या ऐवजी लाकडाची घरे बांधून लोक राहत होते! त्यामुळे १२१२ साली या घरांमधून जळते कोलीत बाहेर पडून पुन्हा या पुलाला आग लागली. सर्व लाकडी घरांमध्ये आग पसरून आत अडकलेल्या लोकांनी भीतीने पुलावरून मिळेल त्या जागी खाली नदीत उडय़ा टाकल्या. ३००० माणसांची या आगीत आहुती गेली!

यानंतर पुन्हा पूल बांधणे क्रमप्राप्तच ठरले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

नेचे

टेरिडोफायटा : ह्य़ा सामान्यत: नेचे म्हणून ओळखल्या जातात. पण सर्व टेरिडोफायटा नेचे नाहीत. फक्त त्याचा एक वर्ग सर्वात जास्त विकसित आहे तो खरा नेचे. या यापूर्वी वर्णन करण्यात आलेल्या सर्व वनस्पती जलवाहिन्या व रसवाहिन्या विरहित होत्या. नेचेपासून मूळ, खोड, पाने, जलवाहिन्या आणि रसवाहिन्यांची सुरुवात होते म्हणून हा एक वेगळ गट संवहनी म्हणून ओळखला जातो. साधारणपणे या वनस्पती पाणथळ, ओलसर जमीन, सावली आणि डोंगरदऱ्यांच्या ठिकाणी आढळतात. मुळांद्वारे जमिनीतून शोषून घेतेलेले पाणी आणि क्षार जलवाहिन्या वनस्पतींच्या इतर भागांपर्यंत पोहोचवतात आणि रसवाहिन्या पानांनी तयार केलेले अन्न सर्व भागांकडे नेण्याचे काम करतात. या वर्गातील वनस्पतींची वाढ बीजाणूंद्वारे होते. या वर्गातील काही वनस्पती वृक्षांच्या फांद्यांवर तर काही चक्क पाण्यात उगवतात किंवा तरंगतात. घनदाट जंगलांमध्ये जमिनीवरील या वनस्पती हमखास दिसतात आणि सदाहरित असल्याने एक सुंदर देखावा निर्माण करतात. आकारातील वैविध्याप्रमाणे अधिवास वैविध्य पण नेच्यांमध्ये दिसून येते.

पाण्यावर तरंगणारे टेरिडोफायईस – साल्वीनीयी, एलोझा

वृक्षांवर उगवणारे टेरिडोफायईस – प्लियोपेलटीस, ड्रायनारिया (बांशीग)

प्रत्यक्ष पाण्यात वाढणारे टेरिडोफायईस : ऑसमूंडा, मारसालीया. काही नेचे प्रचंड मोठय़ा वृक्षासारखे ७-८ मीटर इतके उंच वाढतात त्यांचे खोड चांगले जाड असते आणि वर मोठा पर्णसंभार असतो आणि ठरावीक अधिवासात बघायला मिळतात. त्यांना ट्री फर्न म्हणतात. उदा- सॉयथीया, अल्सोफिला.

पान किंवा पर्णिकेवर असलेल्या बीजाणूधानी पुंजांच्या मांडणीच्या आधारे नेच्याचे वर्गीकरण केले जाते. बीजाणू ओलसर जागेवर रुजतात आणि अनेक प्रक्रियांमधून गेल्यावर नवीन नेचे तयार होतात. इतर सर्व कनिष्ठवर्गीय वनस्पतींची वाढ नेच्याच्या सान्निध्यात होते. त्याचप्रमाणे कीटक आणि लहान प्राण्यांनाही आसरा मिळतो.

उपरोक्त सर्व कनिष्ठवर्गीय वनस्पतींचे असंख्य प्रकार आहेत आणि परिसंस्थेत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. या गटातील वनस्पतींमध्ये वैविध्य आहे, सौंदर्य आहे आणि उपयोगितादेखील आहे.

डॉ. सी. एस. लट्ट,

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

ffice@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old london bridge
First published on: 15-01-2016 at 06:15 IST