कापसांचे मिश्रण : उत्तम व एकसारख्या दर्जाच्या सुताचे कमीत कमी खर्चात उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या, गुणधर्माच्या, किमतीच्या कापसांचे एकजीव मिश्रण करणे अत्यंत गरजेचे असते. वेगवेगळ्या जातीच्या कापसाच्या तंतूंच्या गुणधर्मामध्ये मोठी विविधता असतेच, परंतु एकाच जातीच्या कापसाच्या तंतूंच्या गुणधर्मामध्येही मोठी विविधता असते. कापूस हे नसíगक पीक असल्यामुळे एकाच जातीच्या परंतु वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या शेतात, शेताच्या विविध भागांत, इतकेच काय तर एकाच झाडावर येणाऱ्या विविध बोंडांमध्ये पिकणाऱ्या कापसाच्या तंतूंच्या दर्जामध्ये आणि गुणधर्मामध्ये मोठा फरक असतो. एकाच बोंडातील कापसाचे तंतूही एकसारखे नसतात. अशारीतीने एकाच जातीच्या कापसाच्या तंतूंच्या लांबी, जाडी, ताकद आणि परिपक्वता या गुणांमध्ये प्रामुख्याने फरक असतो. लांब, कमी जाडीच्या, अधिक ताकदीच्या आणि अधिक परिपक्वतेच्या तंतूंपासून अधिक चांगल्या दर्जाचे व अधिक ताकद असलेले सूत तयार होते तर या उलट आखूड, जास्त जाडीच्या, कमी ताकद आणि परिपक्वता असलेल्या तंतूंपासून निकृष्ट दर्जाचे आणि कमी ताकद असलेले सूत तयार होते. एकाच जातीच्या कापसामध्ये वरील दोन्ही प्रकारचे तंतू असल्यामुळे या तंतूंचे एकजिनसी मिश्रण न केल्यास या कापसापासून बनविलेले सूत काही ठिकाणी चांगल्या दर्जाचे तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असे असमान गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे सूत हे एकाच जातीच्या कापसापासून तयार केले जात नाही. तर दोन किंवा तीन जातीच्या कापसापासून ते बनविले जाते. या कापसांच्या गुणधर्मामध्ये थोडाफार फरक असतो. अशा वेळी या सर्व कापसांमधील तंतूंचे अतिशय चांगले मिश्रण होणे गरजेचे असते. याप्रकारे कापूस िपजण विभागात आल्यानंतर पुढे सूतकताईच्या पुढील पूर्वप्रक्रियांसाठी जाण्यापूर्वी त्यातील तंतूंचे अतिशय चांगले व एकजिनसी मिश्रण होणे गरजेचे असते.
िपजण विभागात कापूस पुरेसा िपजून, त्यातील कचरा साफ करून व त्याचे चांगल्याप्रकारे मिश्रण करून झाल्यावर हा कापूस पुढील प्रक्रियेसाठी पाठवायचा असतो. जुन्या िपजण विभागामध्ये प्रक्रियेच्या शेवटी बाहेर पडणाऱ्या कापसाची गादी तयार केली जात असे. याला लॅप असे म्हणत. ही लॅप पुढील यंत्राला पुरविली जाते.
आधुनिक िपजण विभागात कापसाची गादी बनविण्याऐवजी िपजण विभागातून बाहेर पडणारा कापूस नळ्याच्या साहाय्याने सलगपणे पुढील यंत्रास थेट पुरविला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर – बडोद्याच्या मल्हाररावांची कूटनीती
बडोद्याच्या गादीवर आलेल्या खंडेराव गायकवाड याची कारकीर्द इ.स. १८५६ ते १८७० अशी झाली. तो एक लोकप्रिय शासक होता परंतु त्याला मुलगा नसल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ मल्हारराव हा गादीचा कायदेशीर वारस ठरला. खंडेरावाच्या मृत्यूपूर्वी मल्हाररावाने खंडेरावावर मारेकरी घालून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्या गुन्ह्याची शिक्षा भोगत मल्हारराव गेले दीड वर्ष ब्रिटिशांच्या कैदेत होता. खंडेरावचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या पत्नी जमनाबाई गरोदर होती. राजेपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी बडोद्याचा ब्रिटिश रेसिडंट कर्नल ब्रार याने मल्हाररावाला कैदेतून सोडवून बडोद्याच्या राजपदावर बसविले. ब्रारने मल्हाररावाकडून लिहून घेतले की, ‘खंडेराव पत्नी जमनाबाईस मुलगा झाला तर त्वरित राजेपदावरचा माझा हक्क मी सोडेन.’ राजेपदाचा लाभ झाल्यावर कारस्थानी मल्हाररावाने त्याच्या विरोधात असलेल्या लोकांचा छळ आरंभला. माजी दिवाण िशदे यांच्यावर खोटे आरोप ठेवून हातापायात बेडय़ा ठोकून त्यांची धिंड काढली. िशदेंना कैद करून मल्हाररावाने त्यांची सर्व मालमत्ता आपल्या मर्जीतल्या लोकांना वाटून टाकली.
मल्हाररावाला जमनाबाईच्या प्रसुतीत काय होणार याची काळजी होती. जमनाबाईच्या गरोदरपणाचा खोटा दाखला डॉक्टरने लाच घेऊन दिला अशी अफवा त्याने पसरविली. यावर मुंबईच्या गव्हर्नरने तज्ज्ञ इंग्रज डॉक्टर बडोद्यास पाठवून तिच्या गरोदरपणाची तपासणी केली. जमनाबाई खरेच गरोदर असल्याचा दाखला त्या डॉक्टरने दिल्यावर मल्हाररावाने जमनाबाईवर जादूटोणा, मंत्र तंत्रांचा उपयोग करून घातपात करण्याचा प्रयत्न केला. जुल १८७१ मध्ये जमनाबाई प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. ही बातमी कळल्यावर मल्हाररावाने आनंदाच्या भरात स्वतची हत्तीवरून मिरवणूक काढली. मल्हाररावाची बेजबाबदार वागणूक आणि कुशासनाने संतप्त झालेल्या ब्रिटिश रेसिडंट कर्नल फेअरने आपली कुलंगडी बाहेर काढू नयेत, आपला रिपोर्ट व्हाइसरॉय पर्यंत जाऊ नये म्हणून मल्हाररावाने कर्नल फेअरलाच विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prior cotten yarn spinning process part
First published on: 24-06-2015 at 12:57 IST