-यास्मिन शेख

‘त्या लग्नसमारंभाला जाण्यासाठी माझी बहीण तयार झाली. तिने सुंदर साडी घातली होती. माझी आई नऊवारी साडी घालून आमच्याबरोबर येण्यासाठी आधीच तयार झाली होती.’ वरील वाक्यांत ‘घातली’, ‘घालून’ या शब्दांची योजना चुकीची आहे. एखादे शिवलेले वा विणलेले वस्त्र आपण जेव्हा अंगावर चढवतो, तेव्हा ‘घालणे’ या क्रियापदाची रूपे वाक्यांत योजतात. जसे, तो सदरा घालतो, तिने परकर-पोलका (किंवा के) घातला (घातले.), मी पायजमा घालेन. बाबांनी कोट घातला, माझ्या मुलाने मी विणलेला स्वेटर घालून पाहिला. इ. मात्र साडी, लुगडे, धोतर यांच्या संदर्भात ‘नेसणे’ या क्रियापदाची रूपेच वाक्यात योजणे आवश्यक आहे. वस्त्र कमरेपासून खाली निऱ्या करून विशिष्ट पद्धतीने शरीराभोवती गुंडाळणे, यासाठी ‘नेसणे’ या शब्दाची रूपे योग्य आहेत. ‘घालणे’ याचा अर्थ- (आत ठेवणे, ओतणे) परिधान करणे, अंगावर चढविणे, धारण करणे असा आहे. (कंसात दिलेले अर्थ शिवलेल्या वस्त्राच्या संदर्भात नाहीत.) घालणे, नेसणे या शब्दांचे वेगळे अर्थ लक्षात घेऊन वरील वाक्यांतील सदोष शब्दयोजना दूर करता येईल. ही वाक्ये अशी हवीत- ‘तिने सुंदर साडी नेसली होती. माझी आई नऊवारी साडी (लुगडे) नेसून आमच्याबरोबर येण्यासाठी आधीच तयार झाली होती.’

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

आता काही तत्सम शब्द आणि त्यांची सामासिक शब्दांतील रूपे पाहू या. तत्पूर्वी तत्सम (तत्  सम) शब्द म्हणजे काय हे स्पष्ट करते. मराठी भाषेत अनेक संस्कृत शब्द आले आहेत. संस्कृतातून जे शब्द जसेच्या तसे, काहीही बदल न करता मराठीने स्वीकारले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात.

आपण आज अकारान्त व आकारान्त शब्द व सामासिक शब्दांत पूर्वपदी आलेले (समासात दोन वा तीन शब्द एकत्र येऊन त्यांचा एक शब्द होतो. त्याला समास-सामासिक शब्द म्हणतात) शब्द पाहू. (अ) अकारान्त तत्सम शब्द आणि त्यांची सामासिक शब्दांतील रूपे- गृह, मेघ, जल, ग्राम, उदय, आदर्श, विद्यालय इ.  हे शब्द समासांत पूर्वपदी (आधी) आल्यास त्यांची रूपे- अकारान्त- गृहप्रवेश, जलप्रवाह, मेघश्याम इ. अशी राहातात.

(आ) ऊर्जा, प्रजा, सभा, प्रभा, कन्या, क्रीडा, क्षमा, दक्षिणा, मुद्रा, कल्पना इ.  आकारान्त शब्द समासांत पूर्वपदी (आधी) आल्यास त्यांची रूपे आकारान्त-  प्रजापती, सभागृह, कन्यारत्न, कल्पनाविलास  इ. राहाता.

थोडक्यात, सामासिक शब्दांत पूर्वपदी आलेले अकारान्त व आकारान्त तत्सम शब्द जसेच्या तसेच राहतात.  पुढील लेखात इकारान्त व उकारान्त तत्सम शब्दांसंबधी लिहिणार आहे.