गॅलिलिओ आणि सँटोरिओ या दोघांनी बनवलेली तापमापके संवेदनाक्षम होती; परंतु एकाच तापमानाला वातावरणीय दाब बदलला की तापमापकाचे वाचन बदलत असे. १६५४ मध्ये त्या वेळच्या ‘तुस्कानी’ या इटालियन राजघराण्याचे युवराज ‘दुसरे फíडनांडो’ हे हवेच्या दाबाचा परिणाम न होणारे बंदिस्त (sealed) तापमापक बनवण्यात यशस्वी झाले. काचेच्या बंदिस्त नळीमध्ये रंगीत अल्कोहोल भरलेल्या या तापमापकाला ३६० भाग (divisions) होते.  तुस्कानीची राजधानी ‘फ्लोरेन्स’ या नावावरून ही तापमापी ‘फ्लोरेंटाईन तापमापी’ म्हणून ओळखली जाई. प्रमाणित मापनश्रेणी नसल्यामुळे ही तापमापी तितकीशी अचूक नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६६४ मध्ये ‘रॉबर्ट हूक’ या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे सुचवले की, ‘पाण्याचा गोठणिबदू’ हा शून्य बिंदू मानावा आणि बाकीची मापने या बिंदू पासून मोजावीत.  ‘ओले रूमर’ या डेन्मार्कच्या शास्त्रज्ञाने वरील शून्य बिंदूव्यतिरिक्त ‘पाण्याचा उत्कलनिबदू’ हा आणखी एक स्थिरिबदू असावा असे मांडले. १७०१ मध्ये त्यांनी अल्कोहोल आणि पाणी यांचे मिश्रण म्हणजे वाइन वापरून, दुसरे फíडनांडो यांच्या तापमापीप्रमाणे बंदिस्त असलेली तापमापी बनवली. या तापमापीला दोन स्थिर बिंदू होते. ज्या तापमानाला शुद्ध पाणी गोठते ते तापमान ७.५ अंश रूमर आणि शुद्ध पाणी उकळते ते तापमान ६० अंश रूमर असे धरून या दोन बिंदूमध्ये रूमर यांनी ६० समान भाग पाडले. हीच ती रूमरची मापनश्रेणी.

‘दोन स्थिरिबदू आणि त्यामध्ये पाडलेले समान भाग’, ओले रूमर यांची ही कल्पना सर्वस्वी नवीन होती. आधीच्या सर्व तापमापी एकाच्या तुलनेत दुसरा गरम आहे की थंड इतकेच दर्शवत असत. उदा. आजच्या तापमानापेक्षा कालचे तापमान जास्त की कमी हे दर्शवत असत, परंतु आजच्या तापमानात, ३ ऑक्टोबर २०१६ च्या तुलनेत वाढ झाली की घट हे रूमर यांच्या तापमापकामुळे सांगता येऊ लागले. म्हणूनच रूमर यांची मापनश्रेणी आज वापरली जात नसली, तरीही तापमानाची पहिली प्रमाणित मापनपट्टी (First calibrated scale) म्हणून ऐतिहासिक महत्त्वाची आहे.

१७२४ मध्ये डॅनिअल फॅरेनहाईट यांनी याच मापनपट्टीवर आधारित ‘फॅरेनहाईट’ मापनपट्टी प्रस्तावित केली. त्यानंतर काही काळाने अस्तित्वात आलेल्या सेल्सिअस आणि केल्विन मापनश्रेणी आजही वापरल्या जातात.

अनुपमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. इंदिरा गोस्वामी- साहित्य व सन्मान

भारतीय साहित्यात अडीच हजार वर्षे विविध रूपांनी प्रतिबिंबित झालेल्या श्री रामचंद्रांच्या व्यक्तिरेखेने इंदिराजी प्रभावित झाल्या. रामायणावर संशोधन करण्यासाठी त्या वृंदावनात आल्या. अनेक विद्वानांनी लिहिलेली पुस्तकं वाचली. तेव्हा अनेक कथांचे शंकानिरसन झाले. काळजीपूर्वक संशोधन करून ठोस पुराव्यानिशी इंदिराजींनी दाखवून दिलं की, ज्यांच्यामुळे रामाच्या उदात्त प्रतिमेला कलंक लागतो, अशा काही घटना पूर्णपणे प्रक्षिप्त आहेत- उदा. शंबूकाचा मृत्यू, संपूर्ण बालकाण्ड आणि उत्तराकांड, तसेच सुवर्णमृग आणि अग्निदिव्य हे प्रसंग प्रक्षिप्त आहेत.

रामायणाच्या अभ्यासानिमित्त वृंदावनात वास्तव्य करीत असताना, त्यांना वृंदावनातील मंदिरं, भाविकांना लुटणारे, नागवणारे मंदिराचे पुजारी, सेवकवर्ग, महाराज, बाबा या साऱ्यांचे चित्रविचित्र अनुभव आले. अगतिक, दीन, असहाय विधवा- राधेश्यामी, त्यांची निर्धन, लाचार अवस्था, मेल्यानंतरही त्यांची विटंबना. गुंडांकडून फसवल्या गेलेल्या राधेश्यामींचं जीवन लेखिका पाहते. पण ती काहीच करू शकत नाही. कारण काही करण्याचा प्रयत्न केला तर तिला चेटकीण समजून लोक दगडांनी मारतात ही मनोवृत्ती. हे सारं चित्रण, लेखिकेने आयुष्यात घेतलेले आजपर्यंतचे विविध स्तरांवरचे दु:खद अनुभव या साऱ्यांचं हृदयद्रावक वर्णन त्यांच्या ‘अर्धीमुर्धी कहाणी’ या मराठी आत्मकथेत वाचायला मिळतं. या आत्मकथेचा मराठीबरोबर नेपाळी, बंगाली, मल्याळम्सह अनेक भाषांत अनुवाद झाला आहे. हिन्दीमध्ये ही आत्मकथा ‘िजदगी कोई सौदा नहीं’ आणि इंग्रजीमध्ये ‘अ‍ॅन अनफिनिश्ड ऑटो बायोग्राफी’ या नावाने प्रकाशित झाली आहे.

त्यांनी मराठीतील काही साहित्य अर्थात अनुवादित वाचलं आहे. नामदेव ढसाळ यांचं आत्मकथन, दया पवारांचं साहित्य आणि हंसा वाडकरचं ‘सांगत्ये ऐका’ही त्यांनी वाचलं होतं आणि आवडलंही होतं.

इंदिरा गोस्वामी यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. १९८३- साहित्य अकादमी पुरस्कार ‘मामरे धारा तरोवाल’ (कादंबरीसाठी), १९८८- आसाम साहित्य सभा पुरस्कार ‘दाताल हातिर उने खोबा हावदा-’ या कादंबरीसाठी. १९८९- भारत निर्माण पुरस्कार, १९९२- सौहार्दीय सन्मान, लखनौ. १९९६- कमलकुमारी प्रतिष्ठान पुरस्कार गुवाहाटी. १९९७- आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार ‘दाताल हातिर उने खोबा हावदा’ या कादंबरीवर आधारित चित्रपटासाठी.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature measurement history
First published on: 03-10-2017 at 02:49 IST