गेओक तेपे येथे १८८१ साली झालेल्या युद्धात इराणी आणि तुर्कमानी फौजांचा पराभव करून तुर्कमेनिस्तानचा संपूर्ण प्रदेश रशियन झारच्या साम्राज्यात समाविष्ट केला गेला. शेजारच्या उझबेकीस्तानचाही काही प्रदेश रशियन साम्राज्यात घेतला गेला. १९१७ साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीने तुर्कमेनिस्तानच्या सामाजिक परिस्थितीत विशेष फरक पडला नाही परंतु नंतर आलेल्या कम्युनिस्ट सरकारने मुस्लीम लोकांना सक्तीने पहिल्या महायुद्धासाठी लष्करात भरती केले  १९२० मध्ये तुर्की मुस्लीमबहुल असलेल्या तुर्कमेनिस्तान, कझाखीस्तान, किरगीजस्तान आणि उझबेकिस्तान यांच्या सैनिकांनी बोल्शेव्हिक सोव्हिएत युनियन विरोधी बंड केले. बोल्शेव्हिक सरकारने हे बंड मोडून काढले आणि १९२१ साली तुर्कमेनिस्तानमध्ये तुर्कीस्तान स्वायत्त सोव्हिएत सोश्ॉलिस्ट रिपब्लिक सरकार स्थापन झाले. पुढे १९२५ साली तुर्कमेनिस्तान सोव्हिएत युनियनचा एक घटक प्रजासत्ताक देश बनले. परंतु त्यांला तुर्कमेनी नेत्यांचा आणि जनतेचा विरोध होता. सोव्हिएत युनियनच्या सामूहिक शेती आणि निधार्मिक सरकार या धोरणांना तुर्कमेनी समाजाने १९२५ ते १९३२ पर्यंत कडवा सशस्त्र विरोध केला. परंतु सोव्हिएत अधिकाऱ्यांच्या दडपशाही पुढे तो टिकला नाही. या काळात तुर्कमेनी लोकांची मूळची भटकी विमुक्त जीवनशैली आणि पशुपालन व्यवसाय बदलला आणि ती जागा शहरी जीवन पद्धतीने घेतली. १९४८ साली झालेल्या भूकंपात राजधानी अश्गाबादच्या परिसरातील एक लाख १० हजार लोकांचा बळी गेला. राजधानीतील एकतृतीयांश लोक मारले गेले. १९९० साली तुर्कमेनिस्तानच्या संसदेने स्वातंत्र्य घोषित करून संपारमुरात नियाझोव्ह या कम्युनिस्ट नेत्याला राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त केले. या दरम्यान सोव्हिएत युनियनला उतरती कळा येऊन ते कोसळण्याच्या बेतात होते. ऑक्टोबर १९९१ मध्ये इतर तुर्कमेन नेत्यांच्या आग्रहामुळे देशाने सोव्हिएतमधून बाहेर पडून पूर्णपणे सार्वभौम देश जाहीर करावा यासाठी राष्ट्राध्यक्षांनी देशात सार्वमत घेतले. त्याचा कौल सार्वभौम तुर्कमेनिस्तानच्या बाजूने मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkmenistan in post soviet era zws
First published on: 15-10-2021 at 01:35 IST