सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

दक्षिण येमेनमध्ये स्थापन झालेले कम्युनिस्ट सरकार आणि उत्तर येमेनमधील प्रजासत्ताक सरकार यांच्यात सीमाप्रश्नावरून चकमकी घडत होत्या. परंतु १९७९ साली यातून युद्धाला तोंड फुटले. अरब लीगच्या नेत्यांनी या दोन येमेनी प्रदेशांच्या वादात मध्यस्थी करून हा संघर्ष काही काळाकरिता थांबविला. याच काळात दक्षिणेतल्या कम्युनिस्ट येमेनमध्ये नेत्यांची आपसात सत्तास्पर्धा हिंसक होऊन हजारो लोक मारले गेले. या स्पर्धेतून हैदर अबू बकर हे सत्तेवर आले. त्यांनाही दोन्ही येमेनचे एकीकरण व्हावे असे वाटत होते. अखेरीस १९९० मध्ये या दोन्ही येमेनचे एकत्रीकरण होऊन तिथे ‘अल-जमुरियाह अल-येमेनियाह’ म्हणजे रिपब्लिक ऑफ येमेन सरकार स्थापन झाले. अली अब्दुल्ला सालेह हे या सरकारचे पहिले अध्यक्ष नियुक्त झाले.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Rahul Kaswan Congress candidate attacks BJP
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
Jabalpur stage collapsed
VIDEO : मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, पोलिसांसह चारजण जखमी!

उत्तर आणि दक्षिण येमेनचे एकत्रीकरण झाले तरी त्यालाही विरोध करणारे येमेनी बंडखोर होते, अधूनमधून अल-कायदा या अतिरेकी संघटनेच्या कारवायाही होत होत्या तर दुसऱ्या बाजूने इस्लामी कट्टरवाद्यांच्याही कारवाया चालू होत्या. आखातातील १२ लहान बेटांच्या मालकी हक्कावरून आखातापलीकडील एरिट्रिका या छोटय़ा देशाशी येमेनचे तणावग्रस्त संबंध होते. परंतु १९९५ मध्ये येमेनने त्या बेटांवर लष्कर पाठवून तिथे आपला अमल बसविला. पाच वर्षांपूर्वी अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी इराकवर केलेल्या हवाई आणि लष्करी कारवाईला येमेनने विरोध केला होता, त्याचा वचपा काढण्यासाठी सौदी सरकारने सौदी अरेबियात नोकरीधंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या साठ लाख येमेनींना सौदी अरेबियातून बाहेर काढले. १९९९ मध्ये येमेनमध्ये पहिली संसदीय निवडणूक होऊन त्यात अली अब्दुल सालेह हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. येमेनमध्ये विविध राजकीय, धार्मिक, सामाजिक संघर्ष आणि तसेच अल-कायदा, इस्लामी कट्टरतावाद्यांच्या कारवाया नेहमी चालूच असतात. येमेनी जनतेत ६५ टक्के सुन्नी पंथीय तर ३४ टक्के शिया मुस्लीम आहेत. येथील शिया मुस्लिमांना हाउती किंवा हौती म्हणतात. या हौतींमधील स्वत:ला ‘अंसार अल्लाह’ म्हणजे अल्लाहचे समर्थक म्हणवून घेणारा एक गट नेहमी येमेनी सरकारविरोधात काहीना काही खुसपट काढून विरोध करीत असतो.