गडिहग्लज हे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असल्याने पाऊसपाणी चांगले. येथील नदीचे नाव हिरण्यकेशी. गावाची लोकसंख्या अंदाजे चाळीस हजार. गावाला वर्षभर पाणीपुरवठा बऱ्यापकी असतो. पाण्याचा दुष्काळ क्वचितच जाणवतो. पण तरीही येथील नगरपालिकेने दहा-पंधरा वर्षांपूर्वी गावात जमणारे सर्व प्रकारचे सांडपाणी एकत्र जमा करून ते वापरायचे ठरवले.
नगरपालिकेची मंजुरी मिळाल्यावर मग गावातील सर्व प्रकारचे सांडपाणी एकत्र जमवण्यासाठी तळ्याची योजना करण्यात आली. हे पाणी पूर्वी हिरण्यकेशी नदीत सोडले जायी. त्यामुळे नदीचे पाणीही प्रदूषित होत असे. पण आता सांडपाणी गावातील तळ्यात एकत्र जमवल्याने नदीचे प्रदूषण थांबले. नंतर हे पाणी एक दिवस स्थिर ठेवून व पाण्यात तुरटी फिरवल्यामुळे त्यातील गाळ खाली तळाशी साठतो. मग पंप लावून वरवरचे पाणी एका पाइप लाइनने जितक्या शेतांना पुरेल तितक्या शेतांना नगरपालिकेने द्यायचे ठरविले. त्यासाठी शेतकऱ्यांना हे पाणी कसले आहे हे समजावून सांगितले व त्याचा भाव नगरपालिका जे स्वच्छ पाणी देते त्यापेक्षा कमी ठेवला, पण ते पाणी कोणालाही फुकट मात्र दिले नाही. यामुळे जे शेतकरी हे पाणी घेत त्यांना ते बारमाही मिळू लागले व त्यांना दोन-तीन पिके घेता येऊ लागली.
हे पाणी खूप प्रकारची शास्त्रीय प्रक्रिया करून साफ केलेले नसल्याने त्याला थोडा वास येतो. ज्या ज्या शेतांना हे पाणी दिले जाते त्या त्या शेतांवर व त्यांच्या परिसरात हा वास सर्वत्र पसरून राहिलेला असतो. शिवाय हे पाणी हाताळल्याने शेतकऱ्यांच्या हातावर पांढरटपणा दिसतो. त्यामुळे इतर काही इजा मात्र झालेली दिसली नाही. या पाण्याची एकूण देखभाल करण्यासाठी नगरपालिकेने एक माणूस लावला असून तो पंपही चालवतो. शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या पाणीपट्टीतून त्याचा पगार व पंपाचा खर्च भरून निघतो.
या पद्धतीने जर सगळ्या गावांनी सांडपाणी वापरले तर ओलिताखालची जमीन चार-पाच टक्क्याने नक्कीच वाढेल.
-अ. पां. देशपांडे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. – विज्ञान विध्वंस आणि किसिंजर
प्रपंचाचे ज्ञान म्हणजे विज्ञान. मानवी प्रपंचात मानवानेच विज्ञानाकरवी अनेक विध्वंस घडवले आहेत त्या प्रपंचातल्या हेन्री किसिंजर नावाच्या आधुनिक चाण्यक्याची ही कथा.  
हिटलरच्या जर्मनीतील जुलमाला कंटाळून किसिंजर कुटुंब अमेरिकेला पळाले. मेहनती, महत्त्वाकांक्षी आणि उत्तम मती असलेल्या हेन्रीने अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांचा सुरक्षा सल्लागार आणि पुढे परराष्ट्रमंत्री इतपर्यंत मजल मारली. जगाच्या इतिहासातल्या सर्वात प्रखर आणि संततधारेसारखा व्हिएटनामवरचा बॉम्ब हल्ला करण्याचा निर्णय याचा. जुलूम आणि क्रौर्य यांची जवळून ओळख असलेल्या किसिंजर कुटुंबाच्या मुलाला त्या दोन्ही गोष्टींचा तोवर विसर पडला होता. व्हिएटनामवर सत्ता होती फ्रान्सची. त्याचा साम्यवादी क्रांतिवीरांनी पराभव केला तेव्हा खरे तर तह झाला होता, परंतु केनडी या देखण्या आणि एकेकाळी जगाच्या लाडक्या अध्यक्षाने तिथे गोलमाल करून भलत्यालाच सत्तेवर बसवले. कारण अमेरिकेला त्या भागात प्रभाव व वर्चस्व गाजवायचे होते. त्यातूनच पुढे हे युद्ध झाले. उत्तरेतले साम्यवादी हटले नाहीत. निकराने, संख्येने आणि गनिमीकाव्याने झगडले. या युद्धात हजारोंनी अमेरिकन्स धारातीर्थी पडले तेव्हा शेवटचा उपाय म्हणून किसिंजरच्या सल्ल्यावरून हा उत्तर अमेरिकेतला बेचिराख करणारा बॉम्ब हल्ला झाला.
त्या वेळी लीडकथो आणि किसिंजर यांच्यात फ्रान्समध्ये वाटाघाटी झाल्या आणि अमेरिकेला शरणागती न पत्करता तहाच्या नावाखाली पळ काढण्याचा सन्माननीय तोडगा स्वीकारावा लागला. पुढे या दोघांना नोबेल शांतता पारितोषिक द्यायचे ठरले. (ज्या आल्फ्रेड नोबेलच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्याने पैसे मिळवले ते मात्र बंदुकीची दारू बनवून हा आणखी एक विपर्यास.) लीडकथो या व्हिएटनामच्या प्रतिनिधीने हे बक्षीस झिडकारले. ‘कसली डोंबल्याची शांती!’ आमच्यावर युद्ध आणि जुलूम ज्यांनी लादले त्यांच्या पंगतीला मला बसवू नका, असे म्हणून तो मोकळा झाला. किसिंजरने ते बक्षीस समक्ष जाऊन स्वीकारले.
हे महाशय मार्गारेट थॅचर नावाच्या इंग्लंडच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधानांच्या प्रेतयात्रेला हजर होते. सोव्हिएट युनियनचा ऱ्हास होऊ घातला आहे हे मूळ निदान तिचे. पुढे व्हिएटनाम स्वतंत्र झाले खरे, परंतु साम्यवादाच्या जुन्या पगडय़ामुळे अजून अविकसितच (!) राहिले आहे. असेल साम्यवादी, परंतु आपले भूतपूर्व पंतप्रधान वाजपेयी चीनला ज्या दिवशी पाहुणे म्हणून पोहोचले होते, त्याच दिवशी काहीतरी कागाळी काढून साम्यवादी चीनने व्हिएटनामवर स्वारी करून एकेकाळी आपल्याला दिला होता तसा त्यांना एक झटका दिला.
प्रपंचात हे असेच चालते. उद्या तंत्रज्ञानाबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉर अँड पीस  –  हिंमत वाढविण्याकरिता : रुद्राक्ष, भद्राक्ष!
दैवी गुण असलेला रुद्राक्ष हा मणी गेल्या कित्येक काळापासून मानवाला आकर्षित करत आला आहे. पौराणिक आणि ज्योतिष्यविषयक गुणांखेरीज रुद्राक्षाचे वैज्ञानिक महत्त्वही अपार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपल्या ८५ टक्के समस्या मानसिक आणि ताणतणावांशी निगडित असतात. सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक युगात प्रत्येकालाच आपल्या अस्तित्वाची लढाई द्यावी लागते. त्यातून येणारा तणाव प्रचंड वाढला आहे. यातूनच पुढे इनसोम्निया, नैराश्य, हृदयविकार, त्वचाविकार जडतात. रोजच्या आयुष्यातील तणाव आणि काळजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुद्राक्षाची मदत होते. ही एक नैसर्गिक उपचारपद्धती असून रुद्राक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून यश, आत्मविश्वास, रक्तदाब, मानसिक ताणतणाव आणि काळजीवर नियंत्रण, भरभराट आणि कौटुंबिक सौख्यासाठी परिधान केले जात आहेत.
दिवसेंदिवस रुद्राक्षाची लोकप्रियता अनेक पटीने वाढली आहे. याचा फायदा घेऊन काही मंडळी रुद्राक्ष अवाच्या सवा किमतीला विकून चिक्कार पैसा मिळवतात. रुद्राक्ष व भद्राक्ष यातील भेद समजून घेऊ या. एकमुखी, पंचमुखी (नैसर्गिक भोके असलेले), लहानमोठय़ा आकारांचे असे रुद्राक्ष मिळतात. फिलिपाइन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, नेपाळ अशा देशांत रुद्राक्षाची मोठी पैदास होते. भद्राक्ष तुलनेने खूपच स्वस्त असतो. त्याचाही मानसिक बल वाढविण्याकरिता उपयोग होतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी दोन-तीन प्रसंगांत काही जवळच्या मंडळींनी मला अज्जात फसविले. थोडे नैराश्य आले. रुद्राक्षाचे महत्त्व वाचल्यामुळे माझ्याकडे असलेल्या भद्राक्ष माळेतील एक मणी स्वच्छ धुऊन, रात्री तांब्याच्या भांडय़ात भिजत ठेवून, ते पाणी सकाळी लागोपाठ २ आठवडे घेतल्यावर मी मानसिकदृष्टय़ा ठणठणीत झालो.
वाचकमित्रांनो, एकमुखी, पंचमुखी अशा वर्णनाने फसू नका. रुद्राक्षाची शेग वाटाण्याच्या शेंगेसारखी असते. या शेंगेतील टोकाचे व दबलेले मटार आठवा, रुद्राक्षापेक्षा भद्राक्ष वापरा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले