ईशान्य इटलीतील समुद्रकिनाऱ्यावरील अगदी लहानलहान ११७ बेटांचे बनलेले प्राचीन शहर व्हेनिस ऊर्फ व्हेनेसिया हे एकेकाळी अत्यंत शक्तिशाली सत्ताधीशांचे नगर होते. ही लहान बेटे त्यांच्यातील लहान कालवे आणि त्या कालव्यांवरील पुलांनी जोडली गेलीत. पो आणि पायाव या दोन नद्यांच्या मुखांमधील दलदलीच्या, पाणथळ जागेत व्हेनिस शहर उभे आहे. चौथ्या शतकात हूण टोळ्यांचा प्रमुख अटिला तत्कालीन रोमन साम्राज्यावर चालून गेला त्या वेळी त्याने अ‍ॅड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले संपन्न नगर अ‍ॅक्विलिया उद्ध्वस्त केले. त्या वेळी त्याच्या िहसाचारातून वाचलेले लोक जवळच्या पाणथळ, दलदलीच्या प्रदेशात पळून गेले. पाणथळ जागेत मोठे मोठे खांब ठोकून त्यावर या लोकांनी झोपडय़ा बांधून तिथे वस्ती केली. या ठिकाणी राहावयास प्रथम आलेले हे लोक व्हेनिटी जमातीचे असल्यामुळे या वस्तीला आणि पुढे शहराला नाव पडले व्हेनेशिया ऊर्फ व्हेनिस. ‘क्विन ऑफ अ‍ॅड्रिअ‍ॅटिक’, ‘सिटी ऑफ वॉटर’, ‘सिटी ऑफ ब्रिजेस’, ‘दी फ्लोटिंग सिटी’, ‘सिटी ऑफ मासेस’ या नावांनीही व्हेनिस शहराची ओळख आहे. वास्को दी गामाने पूर्वेकडच्या जलमार्गाचा शोध लावण्यापूर्वी चीन, िहदुस्तान येथून येणारे रेशीम, मसाल्याचे पदार्थ व्यापारी खुश्कीच्या मार्गाने व्हेनिस बंदरात आणीत आणि हा माल पुढे सर्व युरोपभरात वितरित केला जाई. व्यापाराच्या जोरावर संपन्न झालेले व्हेनिसचे नाविक दल युरोपात सर्वाधिक प्रबळ होते. एकेकाळी व्हेनिसकडे नौदलात ३५०० लढाऊ नौका होत्या. व्हेनिशियन लोक पक्केव्यापारी! ख्रिश्चन धर्मयुद्धांमध्ये त्यांचा सहभाग होता तोही व्यापारवाढीसाठी. इतर युरोपियन देशांतील लोकांना, सनिकांना इस्रायलच्या युद्धभूमीवर ने-आण करण्याचा ठेका व्हेनिसने घेतला होता. तसेच जलमार्गाने युद्धभूमीवर जाताना भूमध्य सामुद्री देशांमध्ये व्यापार करून पसा कमावण्याची नामी संधी व्हेनिसचे बनिये कसे सोडणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

खैर

केवडय़ाच्या वासाचा कात चुना लावून कळीदार पानाचा विडा न रंगेल तरच नवल! विडय़ाच्या पानात घातलेला या काताची चुना आणि आपल्या तोंडातील लाळ या अल्कली पदार्थाबरोबर रासायनिक क्रिया होते. गडद लाल रंग तयार होतो आणि विडा रंगतो. पानाला लावायचा कात ज्या झाडापासून काढतात ते खैराचे झाड होय. ज्याला संस्कृतमध्ये खदिर, इंग्रजीत कॅटेच्यू तर लॅटिनमध्ये अ‍ॅकेशिया कॅटॅच्यू म्हणतात. लेग्यूमिनासी कुळातील ही वनस्पती केवळ रंगासाठीच नव्हे तर औषधी उपयोगासाठी वापरली जाते. हा एक काटेरी पानझडी वृक्ष असून १२ मीटर ते १५ मीटर उंच वाढतो. ह्य़ाचा आढळ प्रामुख्याने आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी असतो. या झाडाच्या कोवळ्या फांद्या िपगट रंगाच्या असतात. जून खोडाची साल करडी खरखरीत असते. पाने संयुक्त असून पिसासारखी दोन भागांत विभागलेली असतात. खैराची फुले पिवळ्या  रंगाची असतात. त्यांना देठ नसतो. पानाच्या बगलेत किंवा कणसाच्या स्वरूपात पातळ, सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. या शेंगांमध्ये ३ ते ८ बिया असतात. खैराचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. त्याला वाळवी लागत नाही. त्यामुळे त्याचा उपयोग लाकडी खांब, हत्यारे अवजारे, बासरी, होडय़ा इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होतो.

खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात म्हणतात.

खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग व्रण रोपण म्हणून केला जातो. व्रण लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे. कात पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत.

मृणालिनी साठे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veins the town of 117 bets
First published on: 05-05-2016 at 03:59 IST