वीन ऊर्फ व्हिएन्ना हे ऑस्ट्रियाच्या राजधानीचे शहर. तिथले विविध वाद्यवृंद आणि संगीताचे जलसे यामुळे जगप्रसिद्ध आहे. येथील मध्ययुगीन काळातील हॅब्सबर्ग आणि बॅबेनबर्ग राजवटींच्या काळातले राजवाडे, प्रासाद व्हिएन्नाच्या गतवैभवाचे साक्षीदार आहेत. साधारणत: इ.स.पूर्व ५०० मध्ये इथे प्रथम सेल्टिक वंशाच्या लोकांनी वस्ती केली. या वस्तीचे नाव होते वेदुनिआ. पुढे इ.स.पूर्व १५ मध्ये वेदुनिआ रोमन साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आले. रोमन लोकांनी येथे आपला लष्करी तळ उभारला आणि या तळाला लागून लोकांची राहण्याची व्यवस्था केली. या तळाचे आणि वस्तीचे नाव त्यांनी केले. एका मोहिमेवर आला असताना रोमन सम्राट मार्क्‍स ऑरेलियसचा मृत्यू इथे झाला. इ.स. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याच्या अस्तकाळात उत्तर इटलीतील लांगोबार्ड्स या आक्रमक जमातीने रोमनांना या प्रदेशातून हाकलून आपले छोटे राज्य स्थापन केले. ११४६ ते १२४६ असे एक शतक व्हिएन्नाचा ताबा बॅबेनबर्ग घराण्याच्या शासकांकडे होता. १२४६ मध्ये हॅब्सबर्ग या घराण्याचा रुडाल्फ याने व्हिएन्ना आणि ऑस्ट्रियाच्या बऱ्याच मोठय़ा प्रदेशावर राज्य केले. त्याच्या हॅब्सबर्ग घराण्याचा ऑस्ट्रियावरचा अंमल इ.स. १९१८ पर्यंत म्हणजे सहा शतकांहून अधिक काळ होता. हॅब्सबर्ग काळात व्हिएन्ना आíथक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक संपन्न शहर म्हणून उदयाला आले. रुडाल्फ चौथा याने १३६५ साली व्हिएन्ना विद्यापीठ स्थापन केले. हॅब्सबर्ग घराण्याच्या राजांनी मोठा राज्यविस्तार करून हंगेरी आणि बोहेमिया घेऊन ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य स्थापन केले. १५५६ साली व्हिएन्ना या नव्या ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्याची राजधानी बनले. पुढे सोळाव्या शतकात तुर्की आटोमान साम्राज्याचा सुलतान सुलेमान प्रथम याने हल्ला करून व्हिएन्नाला वेढा घातला, पण हॅब्सबर्ग शासकांनी हा वेढा यशस्वीपणे तोडला. १६८३मध्ये परत एकदा आटोमन सेनानी कारा मुस्तफाने मोठय़ा फौजेसह व्हिएन्नावर चाल केली, पण याही वेळी ऑस्ट्रिया-हंगेरी सन्याच्या मदतीला पोलिश सन्य येऊन झालेल्या लढाईत आटोमन फौजेचा पराभव झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

कान्हा राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती

निसर्गाचे वैविध्य लाभलेले कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात असून सुमारे २०० जातींच्या सपुष्प वनस्पती तिथे आढळतात. जमीन खोलगट प्रकारची असल्यामुळे मिश्र वनातील वनस्पती इथे सापडतात. मात्र इथे प्राबल्य आहे ते साल वनस्पतीचे. समशीतोष्ण पानगळ वन हे कान्हा उद्यानाचे वैशिष्टय़ असून उतारावर इथे भरीव बांबूचे वन आढळते. त्याचप्रमाणे धावडा हा वृक्ष भुताचे झाड म्हणून ओळखला जातो, तोही इथे पाहायला मिळतो. याला भूत म्हणायचे कारण म्हणजे या वृक्षाची साल गुळगुळीत आणि पांढऱ्या राखेसारखी दिसते, त्यामुळे रात्री अंधूक प्रकाशात तो वृक्ष भुतासारखा भासतो. त्याच्या खोडातून विशिष्ट प्रकारचा िडक मिळवतात.

कान्हा राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे पर्यावरण असल्यामुळे इथे विविध वनस्पती सापडतात. साल वृक्ष आणि भरीव बांबू म्हणजे बांसबरोबरच इथे इतर वनस्पती आढळतात त्यात तेंदू, पळस, आवळा, ऐन किंवा स्थानिक भाषेत साजा, लेंडिया, बिजा आणि मोह ही काही मुख्य उदाहरणे. याशिवाय इथे विभिन्न वेली, अनेक प्रकारची झुडुपे आहेत. वाघ प्रकल्प इथे राबवला जात असल्याने वाघाचे खाद्य असलेल्या हरणासाठी लागणारे विविध गवतांचे प्रकारही इथे आढळतात. साल आणि बांबू यांचे वन मोठय़ा प्रमाणावर आहे. ३०-३५ मी. उंच वाढणारा साल वृक्ष इमारती लाकडासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या वाळलेल्या पानाच्या पत्रावळी करतात. फळे आणि बियापासून तेल काढतात आणि वेगवेगळ्या प्रकारे ते वापरतात. तेंदूची पाने बिडय़ा बनवण्यासाठी उपयोगात आणतात. मोहाची फुले आणि फळे यांच्यापासून उत्तम दर्जाची दारू बनवतात. कोरकू जमातीतील लोकांचे ते आवडते पेय आहे. मोहाची फुले आणि फळे वेचणे हा एक रोजगाराचा प्रकार असून अनेक आदिवासींची ती रोजीरोटी आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यानात अनेक छोटे-छोटे पाण्याचे साठे आहेत तिकडे त्यांना ताल किंवा तलाव म्हणतात. अशा तालमध्ये आणि काठावर अनेक पाणवनस्पती असून स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान आहेत. इथले वनस्पती जीवन समृद्ध आहे, मुख्य म्हणजे ते बघण्यासारखं आहे.

किशोर कुलकर्णी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vienna university
First published on: 12-07-2016 at 04:40 IST