मागावरून निघालेले सुती कापड दोषासाठी तपासणी करून, पुढील प्रक्रियेत अडथळा येऊ नये अशी काळजी घेऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते. सूत आणि कापडनिर्मिती होत असताना अनेक यंत्रावरून त्याचा प्रवास होतो. त्यामुळे धूळ वगरे अनावश्यक पदार्थ कापडाबरोबर असतात. त्यामुळे सर्वात पहिली प्रक्रिया म्हणजे धुलाई. यासाठी कापड यंत्राच्या साहाय्याने धुतले जाते. या यंत्रात साबण आणि सोडा यांचे द्रावण वापरले जाते. शिवाय कापड यंत्रात असताना त्यावर पाण्याचे फवारे मारले जातात. कापड स्वच्छ करणे आणि कापडात धुलाईच्या रसायनांचा अंश राहू नये, असे दोन्ही उद्देश हे पाणी मारण्याच्या पाठीमागे असतात. पुढील प्रक्रियेसाठी याचा फायदा होतो.
सुती कापड विणण्यापूर्वी ताण्यासाठी (उभे धागे- कापडाच्या किनारीला समांतर धागे) वापरलेल्या सुतास कांजी किंवा खळ यांचा लेप लावलेला असतो. कापड विणताना येणारा ताण सहन करण्याची शक्ती देण्यासाठी असे केलेले असते. कापड विणून तयार झाल्यावर त्याची गरज नसते. म्हणून हा लेप काढून टाकतात. त्याला डिसाइिझग असे म्हणतात. या प्रक्रियेत स्टार्चसारखे नसíगक घटक आणि काही जलविद्राव्य घटक काढून टाकले जातात. या कामासाठी चार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. पहिली पद्धत नेहमीच्या तापमानाला असलेल्या पाण्यात हे कापड किमान २४ तास बुडवून ठेवून कांजी काढली जाते. ही सर्वात स्वस्त पण वेळखाऊ पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीत विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने ही प्रक्रिया करतात. विकरांच्या द्रावणात कापड ८ तास भिजवून ठेवले जाते. हे करताना विकराबरोबर मिठाचाही वापर केला जातो. तिसऱ्या पद्धतीत हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर करतात. पुढे छपाई किंवा रंगाईकरिता जाणाऱ्या कापडासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर करतात आणि द्रावणात कापड ठेवण्याचा कालावधी चार तास एवढा असतो. कापडात विणलेले रंगीत सूत असल्यास (उदा. धोतर) चौथ्या पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीत सोडियम हायपोक्लोराइटचा वापर केला जातो. ठरावीक प्रमाणात हायपोक्लोराइट घेऊन त्या द्रावणात कापड तीन तास भिजवून ठेवतात. चारही पद्धतीत या प्रक्रियेनंतर पुन्हा कापडाची धुलाई करून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – अंतर्मुख करणारे आश्चर्य..
nav02जीन विनगार्टन या वॉशिंग्टन पोस्टमधील पत्रकारानं जोशुआ बेल या सुप्रसिद्ध व्हायोलिन वादकाबरोबर वॉशिंग्टनच्या मुख्य स्टेशनवर केलेला प्रयोग यूटय़ूबवर अपलोड झाला आणि जगभर गाजलेला, पोटोमॅक नदीचा प्रवाह तसाच वाहात राहिला. परंतु, संगीत रसिक, सर्वसामान्य माणसं, ब्रँडना प्रसिद्धी देणारे जाहिराततज्ज्ञ, समाजमानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ अशी यच्चयावत सर्व मंडळी हादरून गेली. प्रयोग साधा होता. जो शुआन (त्याच्या व्हायोलिनची किंमत लाखात मोजावी लागते आणि त्याच्या मैफिलीची तिकिटे वर्षभर आधी बुक होतात. एक तिकीट शेकडो डॉलर्स वगैरे) रेल्वे स्थानकावर उभं राहून आपली कला पेश करावी आणि दुर्मीळ संगीत मैफिलीचा आस्वाद सर्वसामान्य मोफत घेतात किंवा कसे? याचा प्रत्यक्ष पडताळा त्यांना घ्यायचा होता. आजही यूटय़ूबवर ती
दोन-अडीच मिनिटाची क्लिप पाहायला मिळते.
त्या रेल्वे स्थानकात धावतपळत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी क्षणभर थांबून ना त्या सुरेल संगीताचा आस्वाद घेतला, ना त्यांची पावलं रेंगाळली. चारदोन प्रवासी घुटमळले इतकंच. या वादकाची मैफल श्रवण करण्याची लाखो लोक ईर्षां बाळगतात, त्यांनी या संगीत सुरावटीचा आस्वाद घेतला नाही. जोशुआला एका व्यक्तीने फक्त ओळखले!
का घडलं असं? संगीताचा आस्वाद ही फक्त उच्चभ्रू पेज थ्री वर चमकोगिरी करण्यासाठी असतो? संगीतापेक्षा तिथला माहौल, वातावरणनिर्मिती, महागडे तिकीट महत्त्वाचे असते का? हा समाजाचा दोष म्हणावा की दांभिकपणा? की प्राधान्यक्रमानुसार नेकीने आपले काम पार पाडण्याच्या निश्चयावर अढळ निष्ठा?
गाणी ऐकणं असं असेल तर कानाला श्रवणखुंटय़ा लावून आणि मोबाइलवर व्हॉटस्अ‍ॅपचे (मुख्यत:) बाष्कळ विनोद वाचण्याला आपण प्राधान्य का देतो?
हा शहरीकरणाचा, वेगवान जीवनशैलीला मिळालेला अटळ शाप की आपापला मठ्ठपणा? अनेक प्रश्न या प्रयोगानं उपस्थित केलेत.
आपण थांबून जीवनाचा आस्वाद घ्यावा आणि सर्वत्र फुललेलं सौंदर्य पाहावं, परिसरात ‘तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?’ असं स्वानंदी आश्यर्यानं म्हणावं, यात जगण्याचं केवळ प्रेयस नाही तर श्रेयस आहे, याचं भान ठेवावं. शिकण्यासारखं या प्रयोगात खूप आहे. जीवन आजमावण्यासाठी केलेले असे प्रयोग धक्के देतात तसे भानावर आणतात.
आपण फक्त थक्क होतो, अंतर्मुख होतो.
पुलित्झर पारितोषिक मिळाल्यानंतर जीन विनगार्टनने आपल्या संपादकाचं कौतुक केलंय. आणि मनस्वी दाद दिली आहे ती वादक जोशुआला. प्रयोगापूर्वी, ‘तुला कोणीही ऐकणार नाही, ढुंकून पाहाणार नाही.’ असं घडू शकेल याची कल्पना जिनने जोशुआला दिली होती. अग्रगण्य कलाकार म्हणून असलेल्या तुझ्या व्यक्तिमत्त्वावर अशा रीतीने दुर्लक्षिततेच्या अनुभवाची खोल जखम होऊ शकेल. पुन्हा व्हायोलिन हातात घेतल्यावर तारांवर ‘बो’टेकवताना तुझे हातही गारठतील. हे धोके संभवतात. पण जोशुआ खरा कलंदर कलाकार, संगीतपूजक! त्याने सगळं हसण्यावारी नेलं. जिगरबाज कलाकार! आपल्या कर्तृत्वावर, कलेवर आणि बुद्धिमत्तेवर गाढ विश्वास असणारी माणसं वेगळीच असतात. त्यांना गर्व नसतो, स्वत:मधल्या अद्वितीय ठेव्याबद्दल आत्मविश्वास असतो.
पिसारा फुलतो तो अशा रोमांचित अनुभवांमुळे!
डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
consuming Brazil nut nuts to help relieve the symptoms of hypothyroidism benefits of nuts help provide some relief
दिवसातून फक्त दोनदा ‘या’ ड्रायफ्रूटचे करा सेवन; थायरॉईड राहील नियंत्रणात? डॉक्टरांनी सांगितला फंडा
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

प्रबोधन पर्व – स्त्रियांचे दुय्यम स्थान जीवशास्त्रीय की सामाजिक?
‘‘गर्भधारणा व प्रसव ही स्त्रियांच्या जीवनाची स्वाभाविक अंगे आहेत; ती त्यांच्या जीवनाच्या शोकांतिकेची चिन्हे नव्हेत. माणूस अन्नपाण्यावाचून जगू शकत नाही, किंवा प्राणवायूऐवजी नायट्रोजनचा उपयोग त्याच्या फुप्फुसांना करता येत नाही, हे खरे आहे; पण ती मानवी जीवनाची शोकांतिका आहे असे कोणी समजत नाही. हीच कथा स्त्रियांच्या वैशिष्टय़ांची आहे.. स्त्रियांचे दुय्यम स्थान किंवा त्यांचा होणारा छळ यांना निसर्ग जबाबदार नाही. त्यांच्या ठिकाणी गर्भसंभव होतो म्हणून त्या नरकाचे द्वार नाहीत, वा कपटी, मोहवश करणाऱ्यांही नाहीत. कामवासनेवर विजय मिळवण्यात अपयश आलेल्या तापस्यांनी त्यांना ही विशेषणे व दूषणे लावली आणि आपल्या दुर्बलतेचे खापर त्यांच्या माथी फोडले. ही घटना सामाजिक आहे, जीवशास्त्रीय नाही. जीवसृष्टीत गर्भधारणा हा नित्यप्रसंग आहे. संस्कृतीने वाळीत टाकलेल्या खालच्या थरांत गर्भवतीबद्दल आस्था दिसून येते. गर्भारपणाबद्दल स्त्रियांना कोणी कमी लेखीत नाही.’’
‘भारतीय स्त्रीजीवन’ (मौज प्रकाशन गृह, ऑगस्ट १९८६) या पुस्तकात गीता साने निसर्गनियम आणि समाजनियम यांच्या सीमारेषा स्पष्ट करत भारतीय स्त्रियांविषयी लिहितात –
‘‘समाजाच्या संकेतांनी स्त्रियांना विवाह आवश्यक केला. आणि ह्य़ाच संकेतांनी विवाहबाह्य़ गर्भधारणेसाठी त्यांचा अतोनात छळ केला. पातिव्रत्य हा सामाजिक संकेत आहे; निसर्गाचा नियम नाही.. पतीशिवाय इतरांच्या संभोगाने वा बलात्काराने स्त्रिया विटाळतात त्या समाजाच्या नियमांनी, सृष्टीच्या नियमांनी नव्हे. स्त्रियांच्या मुक्त आचार-संचाराला निसर्गाचा विरोध नाही. .. ..  नैसर्गिक अडचणीची भाषा करताना आपण स्त्रीपुरुषांतील वर्गभेद व लिंगभेद ह्य़ांच्यात गफलत करीत असतो.. विज्ञानाचा हवाला देऊन स्त्रीस्वातंत्र्याला घेतलेला हा आक्षेपही फार काळ टिकणार नाही; पण तो चूक आहे असे सिद्ध होईपर्यंत विज्ञानाच्या आधाराने एखादा नवा आक्षेप उभा करण्यात येईल. समाजाची नवरचना समतेच्या पायावर होईतो हे रहाटगाडगे असेच चालत राहील.’’