हे वाक्य वाचा – ‘मी आणि माझे दोघं मित्र आज सिनेमाला जाणार आहोत’. या वाक्यात ‘माझे दोघं मित्र’ हा शब्दप्रयोग चूक आहे. मित्र हा शब्द नाम, पुल्लिंगी एकवचनी आहे. त्याचप्रमाणे या शब्दाचे अनेकवचन मित्र असेच होते. जसे एक देव-अनेक देव ; एक पर्वत-  अनेक पर्वत, तसेच अनेक मित्र.

नियम असा आहे, की नाम हे पुल्लिंगी, अकारान्त असेल, तर त्याचे अनेकवचन तेच राहते. फक्त वाक्यात योजताना हे शब्द कर्तृस्थानी (कर्ता) असल्यास, त्यांना लागणारी विशेषणे विकारी असल्यास ती अनेकवचनी होतात आणि क्रियापदेही अनेकवचनी होतात. जसे – मला माझा आवडता मित्र भेटला/ सारेच माझे आवडते मित्र आहेत. वरील वाक्यात ‘माझे दोघं मित्र’ यात चूक आहे कारण मित्र पुरुष आहेत, म्हणून माझे दोघे मित्र हे बरोबर आहे. दोघे, तिघे, चौघे हे शब्द पुल्लिंगी आहेत. या शब्दांतील ‘घे’ या अक्षरावर मात्रा आहे. या एकाराऐवजी अनुस्वार(घं) येत नाही. या शब्दाच्या उच्चारात ‘घ’ हे आघातयुक्त नाही किंवा लेखनात एकाराऐवजी अनुस्वार देता येणार नाही. पतिपत्नी या शब्दात पती- पु. पत्नी- स्त्री. आहे. ‘ती दोघे (घं) माझ्याकडे आली होती’. या वाक्यात ‘ती’ हे – ‘ते’ याचे अनेकवचनी सार्वनामिक विशेषण – ती आहे. त्यामुळे इथे ती दोघे – दोघं अशी रूपे होतील. मात्र दोन मुलगे, दोन मित्र किंवा दोन भाऊ असतील, तर ते दोघे असेच लिहिणे व उच्चारणे योग्य आहे. लिखाणात तरी माझे दोघं मित्र – भाऊ, मुलगे अशी चूक करू नये.

a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Wolves terrorize villages in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ‘हायब्रीड’ लांडगे बनलेत नरभक्षक! कारणे काय? बळी किती? बंदोबस्त कधी?
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
wheat panjiri for making an offering to Lord Krishna
श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी गव्हाच्या पंजिरीची सोपी रेसिपी; पटकन नोट करा साहित्य, कृती..

आणखी एका शब्दात वारंवार होणारी एक चूक – जी लिहितानाही आणि बोलतानाही होते – आपण सुधारली पाहिजे. तो शब्द आहे ‘तज्ज्ञ’. हा शब्द तज्ञ असाच उच्चारला जातो आणि लेखनातही अनेक वेळा असाच शब्द योजलेला आढळतो. ‘तत् + ज्ञ = तज्ज्ञ’ हा संस्कृतातील सामासिक शब्द मराठीत आलेला आहे. या शब्दाचा अर्थ आहे – कुशल. जाणणारा, ज्ञानी, त्या विषयात पारंगत. ‘तत्’ पुढे ‘ज्ञ’ आल्यामुळे त् चा ज् होतो.

एका मराठी भाषकानं मला असं सांगितलं, ‘तज्ज्ञ’ शब्दांतील ‘ज्’ सायलेंट आहे! सायलेंट म्हणजे अनुच्चारित! इंग्लिशसारखी (उदा. – knife –  k silent) मराठीत सायलेंट अक्षरे नाहीत; तेव्हा  ‘तज्ज्ञ’ हा शब्द बरोबर आहे. लेखनात तो स्वीकारणे आवश्यक आहे.

– यास्मिन शेख