15 August 2020

News Flash

लेनोवोचा झेडयूके झेड वन

लेनोवो इंडियाने नुकताच झेडयूके झेड वन हा स्मार्टफोन लाँच केला.

लेनोवो इंडियाने नुकताच झेडयूके झेड वन हा स्मार्टफोन लाँच केला. या फोनमध्ये सायनोजेन ओएस १२.१ ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. या प्रवाही ऑपरेटिंग सिस्टममध्ये असलेले अ‍ॅडव्हान्स फीचर्स पॉवर कन्झम्प्शन, सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यासाठी अनुकूल आहेत. लेनोवो झेडयूके झेड वनमध्ये थ्री जीबी रॅम असून त्यात ६४ जीबी इंटरनल मेमरी इतकी क्षमता आहे. यामुळे ग्राहक त्यांना हवे असलेले अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड करू शकतात. शिवाय फोन मेमरीमध्ये सेव्हही करू शकतात. यासाठी आता फोनमधल्या जागेची काळजी करायची गरज नाही. २.५ गिगाहर्ट्झ स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर आणि थ्री जीबी रॅम असलेला हा फोन उत्तम परफॉर्मन्स देतो. हा फोन १५००:१ कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि ४५० निट्स ब्राइटनेस देतो. या फोनचा रिअर कॅमेरा डय़ुअल एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेल इतका आहे. या फोनच्या बॅटरीमध्ये इंटेलिजंट कट ऑफ फीचर आहे. हा फोन या फीचरमुळे फोनची बॅटरी वापरण्याऐवजी पॉवर सोर्सचा वापर करतो. यामुळे फोनची बॅटरी बराच काळ टिकण्यास मदत होते. हा फोन पांढऱ्या आणि करडय़ा रंगात उपलब्ध असून तो १३,४९९ इतक्या किमतीत मिळतो.

वैशिष्टय़े :

ऑपरेटिंग सिस्टम       :      अ‍ॅण्ड्रॉइड ५.१

डिस्प्ले :      ५.५० इंच

रेझोल्यूशन      :      १०८० ७ १९२०

डायमेन्शन्स     :      १५५.७० ७ ७७.३० ७ ८.९०

वजन   :      १७५.०० ग्रॅम्स

प्रोसेसर :      २.५ गिगाहर्ट्झ क्वाड कोर क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर

मेमरी   :      ६४ जीबी इंटरनल मेमरी, एक्स्पांडेबल मेमरी नाही, ३ जीबी रॅम.

कॅमेरा   :      १३ मेगापिक्सेल रिअर, ८ मेगापिक्सेल फ्रंट

बॅटरी   :      ४१०० एमएएच (नॉन रिमुएबल बॅटरी)

कनेक्टिव्हिटी    :      डय़ुअर सिम (जीएसएम), वायफाय, जीपीएस, ब्लुटूथ, एफएम, थ्रीजी, फोरजी.

सेन्सर्स :      प्रॉक्झिमिटी सेन्सर, अ‍ॅम्बिएंट लाइट सेन्सर, अ‍ॅक्सलेरोमीटर आणि गायरोस्कोप.

पॅनासॉनिकचे नवे हेडफोन्स

पॅनासॉनिकचे आरपी-एचएफ ३०० हे नवीन हेडफोन उत्तम दर्जाचे आहेत. या हेडफोनमध्ये आवाजाचा उत्तम दर्जा, स्टायलिश डिझाइन आणि कॉम्पॅक्ट फोल्डिंग कॅपेबिलिटी या तिन्ही सुविधा उत्तमरीत्या एकत्रीकरण केलेल्या आहेत. सुस्पष्ट आवाज ऐकू येण्यासाठी या हेडफोनमध्ये उत्तम सुविधा आहे. वजनाने हलके असलेले हे हेडफोन्स स्टायलिश डिझाइनने सजवले आहेत. शिवाय यातल्या कॉम्पॅक्ट फोल्डिंग फीचरमुळे हे लहान जागेतही ठेवता येते. बाहेर जात असताना हे हेडफोन्स सोबत घेऊन जाण्यासाठी ते दोन प्रकारे फोल्ड होऊ शकतात. कानांमध्ये फिट बसतील अशी सोय या हेडफोन्समध्ये केलेली आहे. हेडफोन्स इर्गोनॉमिक डिझाइनवर आधारित असून ते मूळ आर्म स्ट्रक्चरचं बनवलं आहे. संगीताचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी इअर पॅड्सचीसुद्धा सुविधा आहे. यामध्ये १.२ मी. अँटी टँजिबल केबलही आहे. या केबलचा उपयोग बाहेर असताना चांगला वापर होतो. पॅनासॉनिक आरपी-एचएफ ३०० हेडफोन्स काळा, पांढरा, निळा आणि गुलाबी या चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत. याची किंमत १,४९९/- इतकी आहे.

एलजीचा स्टायलस टू

एलजीने नुकताच स्टायलस टू हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. नॅनो कोटेड टीप असलेलं पेन हे या फोनचं वैशिष्टय़ आहे. याआधीच्या रबर टीप्ट पेनपेक्षा या नव्या फोनच्या पेनमुळे फोनचे फंक्शन्स वापरण्यात अधिक अचूकता येते. तुम्ही जेव्हा हे पेन वापरत नाही तेव्हा तुमच्या स्क्रीनवर पॉप मेमो येतो. पेन कीपर हे आणखी एक वैशिष्टय़ आहे. चुकीच्या ठिकाणी चुकीचा पॉप मेसेज जाऊ नये यासाठी हे पेन कीपर फंक्शन काम करतं. कॅलिग्राफी करणाऱ्यांसाठी उपयुक्त सुविधाही या फोनमध्ये आहे. ग्राहकांना कॅलिग्राफीचा वापर करून काही लिहायचं असेल तर कॅलिग्राफी पेन फाँटचा उपयोग होऊ शकतो.

५.७ इंच असलेला हा फोन ७.४ मिमी इतका पातळ असून १४५ ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. या हँडसेटची डिझाइन एकदम वेगळी आहे. पुढील भाग प्रोटड्रेड फ्लॅट डिस्प्ले आहे; तर मागच्या बाजूस स्पिन हे अपलाइन पॅटर्न आहे. याच्या सर्व कडांना मेटालिक फ्रेम्स आहेत. ३००० एमएएच इतकी बॅटरी असून याच मायक्रो एसडी कार्ड २ टीबीपर्यंत वाढू शकते. एलजी स्टायलस टू गेल्याच आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत आलेला आहे. याची किंमत १९,५०० इतकी आहे.

वैशिष्टय़े :

डिस्प्ले :      ५.७ इंज एचडी इन-सेल टच (१२८० ७ ७२०)

चिपसेट :      क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन

कॅमेरा   :      रीअर १३ मेगापिक्सेल, फ्रंट ८ मेगापिक्सेल

मेमरी   :      २ जीबी एलपीडीडीआर ३ रॅम, १६ जीबी रॅम, मायक्रो एसडी २ टीबीपर्यंत.

बॅटरी   :      ३००० एमएएच (रिमुएबल)

ऑपरेटिंग सिस्टम       :      अ‍ॅण्ड्रॉइड ६.० मार्शमॅलो

साइज   :      १५५ ७ ७९.६ ७ ७.४ मिमी

वजन   :      १४५ ग्रॅम

नेटवर्क :      व्होल्ट/एचएसपीए+/जीएसएमसह फोर जी एलटीई

कनेक्टिव्हिटी : वायफाय ८०२.११ बी, जी, एन/ब्लुटुथ ४.१/ यूएसबी २.०

रंग     :      टायटन/ पांढरा/ तपकिरी

विंडोज टेन लॅपटॉप ९९९९ रुपयांत

आयबॉल कंपनीने इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांशी धोरणात्मक करार करून अत्याधुनिक लॅपटॉपची श्रेणी लाँच केली आहे. आयबॉल कॉम्पबुक ११.६ इंची एक्सलन्स आणि १४ इंची एक्सम्प्लेअर असे दोन लॅपटॉप येत्या काही काळत लाँच केले जातील.

विद्यार्थी आणि घरगुती वापरासाठी आयबॉल कॉम्पबुक लॅपटॉप विंडोज टेन होम आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत. व्यवसायचालकांसाठी आयबॉल कॉम्पबुक लॅपटॉप आधुनिक विंडोज टेन प्रोसह उपलब्ध असून त्यात सेक्युअर बूट, डोमेन जॉइन, बिट लॉकर, रिमोट डेस्कटॉप अशी वैशिष्टय़े आहेत.

या लॅपटॉपला प्री इन्स्टॉल्ड विंडोज टेन आणि इंटेल क्वाड कोअर प्रोसेसरची जोड देण्यात आली असून त्याचा वेग १.८३ जीएचझेड आहे. या लॅपटॉपला दोन जीबी रॅम आणि ३२ जीबी इन बिल्ट स्टोअरेज देण्यात आले आहे. हा स्टोअरेज मायक्रो एसडी स्लॉटसह ६४ जीबीपर्यंत वाढवता येईल. लॅपटॉपमध्ये आणखी स्टोअरजेसाठी बाहय़ एचडीडीचीही जोड देण्यात आली आहे. इन बिल्ट वाय फाय, ब्लूटुथ (४.० व्हर्जन), एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्टमुळे आयबॉल कॉम्पबुकला विविध कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. दोन्ही लॅपटॉपला उच्च दर्जाचे दुहेरी स्पीकर्स, हेडफोन व माइकसाठी एक ३.५ एमएम कॉम्बो जॅक देण्यात आला आहे. त्याशिवाय या लॅपटॉपवर विमा योजना (अपघाती बिघाड, चोरी आणि फुटणे) आणि एक वर्षांची पर्यायी वॉरंटी यांसारखे पर्याय देण्यात आले आहेत.

आयबॉल कॉम्पबुक एक्सलन्स शाही निळ्या रंगात; तर एक्समप्लेअर तपकिरी रंगात उपलब्ध आहे. या लॅपटॉपची बांधणी दर्जेदार असून हाय क्वालिटी दृश्यांसह (एचडी) हे लॅपटॉप वजनाला हलके पण मजबूत आहेत. एक्सलन्सचे वजन १.१ किलोपेक्षा कमी आहे, तर एक्समप्लेअरचे वजन दीड किलोपेक्षा कमी आहे. त्यात असलेली १०,००० एमएएच बॅटरी साडेआठ तास कामाची खात्री देते. साडेआठ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक आणि २२ तास अविरत संगीतामुळे कोणत्याही अडथळ्याविना मनोरंजनाचा आनंद घेता येतो. आयबॉल कॉम्पबुक एक्सलन्स ९९९९ रुपयांत तर आयबॉल कॉम्पबुक एक्झमप्लेअर १३,९९९ रुपयांत उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:11 am

Web Title: new gadgets in market 3
Next Stories
1 इंटेक्सचा अ‍ॅक्वा लायन्स थ्रीजी स्मार्टफोन
2 इंटेक्सची नवी ब्लूटूथ स्पीकर सिस्टिम
Just Now!
X