03 August 2020

News Flash

स्वातंत्र्य समलिंगी शरीरसंबंधांचे!

प्रौढ व्यक्तींमधील ‘सहमतीने’ होणाऱ्या शरीरसंबंधांत नैसर्गिक / अनैसर्गिक वगैरे भेद असावा का?

01youthसमलिंगी संबंधांकडे गुन्हा म्हणून बघितले जाऊ नये यासाठीच्या दुरुस्तीसाठीचे विधेयक काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी नुकतेच संसदेत मांडले. जगातील इतर देशांमधले वातावरण आणि समलिंगींच्या चळवळीचा दबाव पाहता  हा विषय अलीकडच्या काळातला दुर्लक्ष न करता येणारा विषय आहे.

त्याकडे आजची तरुणाई कसे पाहते?

Rahul
January 5 at 10:31pm

प्रौढ व्यक्तींमधील ‘सहमतीने’ होणाऱ्या शरीरसंबंधांत नैसर्गिक / अनैसर्गिक वगैरे भेद असावा का?

Like · Comment · Seen by 5

 

Manisha मला वाटतंय नसावा..! सहमती असेल तर नैसर्गिक/ अनैसर्गिक असा भेदच उरत नाही.

Like • Reply • January 6 at 5:31pm

 

Manisha संकेत, या सगळ्याची आणखी माहिती दे ना.

Like • Reply • January 6 at 5:32pm

Radhika  ऋतुजाप्रमाणे मलाही नाही वाटत की ते शरीरसंबंध खरंच दोन्ही प्रौढ व्यक्तींच्या सहमतीने होत असतील तर असा भेद असावा.

Like • Reply • January 6 at 8:07 pm

Sneha दोन व्यक्तींच्या सहमतीने होणाऱ्या शारीरिक संबंधांमध्ये असा कुठला भेद असू नये; खरं तर स्त्री-पुरुष संबंधांना ‘नैसर्गिक’ म्हणताना समलिंगी संबंधांकडे ‘अनैसर्गिक किंवा चुकीचं’ अशा पद्धतीने बघितलं जातं, जे बरोबर आहे असं मला वाटत नाही. कारण समलिंगी आकर्षण असणाऱ्या व्यक्तींसाठी तेच आकर्षण, प्रेम नैसर्गिक असतं; त्यामुळे असा भेदभाव करू नये असं मला वाटतं. अजूनही समाजात अशा व्यक्तींना आपले हक्क मिळवण्यासाठी, समाजात मानाचे स्थान मिळवण्यासाठी रूढी, परंपरा या सगळ्याविरुद्ध लढा द्यायला लागतोय. अजूनही एका गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्याकडे समाज बघत आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत नुकत्याच मांडलेल्या विधेयकातही हा दावा केलाय की ‘अशा १८ वर्षांच्या वर असलेल्या समलिंगी व्यक्तींमध्ये सहमतीने होणाऱ्या शारीरिक संबंधांकडे गुन्हा म्हणून बघितले जाऊ  नये.’ मुळात शारीरिक आकर्षण, प्रेम, विवाह, शारीरिक संबंध या सर्व व्यक्तिगत बाबी आहेत; जोपर्यंत मर्जीविरुद्ध ह्य गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत त्याला गुन्ह्यचे स्वरूप देण्याची काहीच गरज नाही, हे आता तरी लोकांना समजायला हवं! उलटपक्षी अशा समलिंगी व्यक्तीदेखील समाजाचाच एक भाग आहेत, त्यामुळे त्यांना समाजात योग्य तो दर्जा मिळणं, मूलभूत हक्क मिळणं ही समाज म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या समलिंगी असण्यावरून त्यांना नाकारणं हाच एक गुन्हा आहे, असं मला वाटतं!!

Like • Reply • 2 • January 6 at 9:57pm

Manisha  येस्स.. यू आर करेक्ट प्रत्येकाचं सुख कशात आहे ते प्रत्येकाला कळतं आणि लैंगिक सुख म्हणजे अगदीच पर्सनल गोष्ट आहे. त्यामध्ये जर नैसर्गिक/ अनैसर्गिक असा भेदभाव झाला तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येईल असं मला वाटतं.

Like • Reply • January 6 at 10:40pm

Manjiri मला असं वाटतं की दोन सजाण व्यक्तीमधील शारीरिक संबंध त्यांच्या इच्छेने आला तर त्यात नैसर्गिक किंवा अनैसर्गिक असा भेदभाव असण्याचं काही कारण नाहीये. एक तर आपण लोकांचा फार विचार करतो. त्यांना काय वाटेल लोकं काय म्हणतील. आणि दुसरं म्हणजे आपण हे बघत आलोय की लग्न करणं किंवा शारीरिक संबंध हे फक्त स्त्री आणि पुरुषांमध्येच येऊ  शकतात. म्हणून कदाचित नैसर्गिक किंवा अनैसर्गिक असा भेद असावा का प्रश्न उद्भवला असावा.

Like • Reply • January 6 at 11:40pm

Radhika  ग्रीष्मा ही मानसिकता बदलायला वेळ लागणार. आणि तोपर्यंत असे प्रश्न उद्भवत राहणार, अशा चर्चा होत राहणार.

Like • Reply • January 6 at 11:59pm

Rahul   सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना ओळख तर मिळवून दिली..पण त्यांच्या शरीर संबंधांच्या हक्काचे काय?

Like • Reply • January 7 at 10:22pm

Sneha अल्पसख्याकांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगण्याचे, त्यांचे समान हक्क समाजात वापरण्याचे, त्यांचे प्रेम, आकर्षण, शारीरिक संबंध, लग्न याविषयी असलेल्या भावना आणि प्रेफरन्सेसचं स्वातंत्र्य मिळतं का? हा गांभीर्याने विचार करण्याचा आणि त्यांना समान स्वातंत्र्य मिळवून देण्याचा विषय आहे..

नुकतेच माझ्या ओळखीतल्या एका अस्सल मराठमोळ्या मुलाने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. अगदी थाटामाटात, मित्रमैत्रिणी, आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत. एवढंच नाही तर हा आनंद ‘फेसबुक’वर फोटो शेर करून इतर लोकांबरोबरही व्यक्त केला. अर्थातच ही घटना भारतात घडलेली नाही, हे वेगळं सांगायची गरज नाही.. ज्या वेळी अशा अनेक घटना भारतात घडतील, आपली न्यायव्यवस्था अशा समलिंगी संबंधांना तितकाच मान देईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण एक पाऊल पुढे गेलो असं म्हणता येईल.

Like • Reply • 1 • 2 hrs

Manisha बरोबर. मलाही वाटतं की प्रत्येकाला त्यांच्या गरजा पुरवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि प्रेम ही माणसाची गरज आहे.

प्रत्येकाची शारीरिक गरज वेगळी असते. मग ती पुरवण्यासाठी कायद्याने बंधने का घालावीत? आपण सर्रास सॉफ्टवेअर अपडेट करत असतो, पण स्वत:ला अपडेट करू शकत नाही. ते केलं तर तेजाली तू म्हणतेस तसं भारतात अशा घटना घडायला हरकत नाही..!

Like • Reply • 1 hr • Edited

Rahul   स्पष्ट सांगायचे तर माझा ‘अनैसर्गिक’ उल्लेख हा माणसाकडून प्रसंगी होणाऱ्या प्राण्यांवरील लैंगिक अत्याचाराला अनुसरून आहे. हे क्रूर आणि विकृत आहे आणि अशा कृतींविरोधी कायदा असायलाच हवा.

प्रौढ व्यक्तींमधील ‘सहमतीने’ होणारा शरीरसंबंध या आपल्या मूळ विषायाबद्दल मलाही असे वाटते की एखाद्याचा कल आणि आवड; म्हणजेच ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ आणि ‘सेक्शुअल प्रेफरेन्सेस’ ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवे, कारण ही अत्यंत खाजगी बाब आहे.

पण जोवर आपल्या व्यवहाराने इतरांना त्रास होत नाही तोवरच ही बाब ‘खाजगी’ म्हणता येईल. बहुसंख्यांची आवड ती नैसर्गिक आणि अल्पसंख्याकांची ती अनैसर्गिक, असा भेदभाव नसावा.

Unlike • Reply • 1 • 2 hrs

Radhika  बरोबर बोलतो आहेस तू संकेत. आपल्याकडे बहुसंख्याकांची आवड नैसर्गिक मानली जाते आणि ते सगळ्याच बाबतीत होतं. हा तर खूप नाजूक विषय आहे आणि अशा बाबतीत समाजाच्या रूढी-परंपरा खूप घट्ट असतात. ते बदलणे खूप कठीण असते म्हणून जे ते बदलायचा प्रयत्न करतायेत त्यांनी समाजाच्या कलाने घेऊन योग्य पद्धतीने गोष्टी पटवून दिल्या पाहिजेत. हा राजकीय मुद्दा बनवला गेला तर याचा निष्कर्ष लागणे खूपच कठीण होईल हे नक्की.

Like • Reply • 1 • 1 hr

Rahul  मुद्दा राजकीय बनावा, पण राजकारणाचा नव्हे!

‘निर्भया’ प्रकरणातील तपास, न्यायप्रक्रिया, कायद्यातील बदल हे सर्व राजकीय मुद्दय़ामुळेच होऊ  शकले. पण शोकांतिका म्हणजे तोपर्यंत अनेक निर्भयांचा बळी गेला होता.

समलैंगिक, तृतीयपंथीय अशा अल्पसंख्याकांवरही प्रचंड अत्याचार होतायेत. कुठे पोलिसांची लुबाडणूक तर कुठे फसव्यांचे रॅकेट्स. फक्त ‘बदनामी’च्या भीतीने याची बातमी सहसा होत नाही.

दुर्दैवाने कुणीतरी ‘बळी’ जाईपर्यंत या विषयांवर योग्य राजकारण होणार नाही.

Unlike • Reply • 1 • 1 hr
टीम युथफुल – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 1:21 am

Web Title: gay and lesbian relationship
Just Now!
X