नीरज राऊत

पालघर:  वनहक्कपट्टे वितरणात पालघर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यतील ४७ हजार २०१ वनपट्टय़ांचे वितरण पूर्ण झाले आहे. राज्यातील एकूण वनपट्टे दाव्यांच्या  प्रमाणात पालघरचा वाटा २५ टक्के इतका आहे.

Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

जिल्ह्यत वितरित वनहक्क पट्टय़ांचे क्षेत्र २८ हजार ९८७ हेक्टर इतके असून १८ हजार २१४ हेक्टर क्षेत्राचे वितरण अजूनही प्रलंबित आहेत. ४६ हजार २८५ वनहक्क धारकांना सात-बारा उताऱ्याचे वितरण करण्यात आले आहे. ९१६ धारकांना सात-बारा मिळणे प्रलंबित आहे. प्रलंबित दाव्यांपैकी १६७९ दावे उपविभाग स्तरावर तर १४४७ दावे जिल्हास्तरावर तर १२७ सामुदायिक दावे  प्रलंबित  आहे.

गेल्या काही महिन्यात नव्याने वनहक्क दावे दाखल झाले असून इतर काही प्रलंबित दाव्यांसह काही वनपट्टय़ांच्या जमिनीची प्रत्यक्ष मोजणी व सीमांकन करणे काही तालुक्यांमध्ये प्रलंबित आहे.  ४३७ सामुदायिक वनहक्क दाव्यांना मंजुरी देण्यात आली असून त्याचे क्षेत्रफळ २२ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. मंजूर दाव्यांमध्ये डहाणू तालुक्यात सर्वाधिक १०३७४ हेक्टर  वनपट्टय़ांचे क्षेत्रफळ आहे. त्याच बरोबरीने जव्हार (४५९९), विक्रमगड (३७६०), वाडा (३००६), पालघर (२४११), मोखाडा (१९२७), तलासरी (१६३१), वसई (५७१)  जमिनीचा समावेश आहे.

जिल्हा नेहमीच अग्रेसर

वनहक्क दाव्यांचा संदर्भात पालघर जिल्हा हा सुरुवातीपासून अग्रेसर राहिला असून नोव्हेंबर २०२० पासून ६,७९८ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करण्यात आले.   राज्यात पालघर पाठोपाठ नाशिक (३१,८८०), नंदुरबार (२७०८३), धुळे (१४५६६) तर गोंदिया (९१९४) या जिल्ह्यंचा वनहक्क पट्टय़ांच्या वितरणामध्ये क्रमांक लागत आहे.