पालघर बोईसर दरम्यान फाटक क्रमांक ४९ येथे उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर टाकण्याच्या कामी १३ जुलै रोजी सकाळी ८.३० ते १०.३० दरम्यान दोन तासांकरिता ब्लॉग घेण्यात येणार आहे. यावेळी लांब पल्याच्या काही गाड्या पूर्णतः तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपूलांच्या कामदरम्यान गर्डर टाकण्याकरिता गेल्या काही महिन्यांपासून सतत ब्लॉक घेण्यात येतो. यावेळी लांब पल्ल्यासह काही लोकल तर काही पूर्णतः रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे कामावर व बाहेरगावी जाणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

१३ जुलै रोजी रविवारी फाटक क्रमांक ४९ येथे गर्डर टाकण्यात येणार असून यादरम्यान दोन तासाचा ब्लॉक घेणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. या दरम्यान अपमार्गावरील १९००२ सुरत विरार इंटरसिटी एक्सप्रेस ही वाणगाव येथेच थांबवण्यात येणार आहे. ५९०३९ विरार वलसाड पॅसेंजर ही वाणगाव ते विरार दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ६१००१ ही बोईसर ते वसई रोड व ६९१७४ ही डहाणू रोड बोरीवली गाडी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.

डाऊन मार्गावरील ६१००२ डोंबिवली ते बोईसर दरम्यान धावणारी गाडी वसई येथे थांबविण्यात येणार असून वसई रोड ते बोईसर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ६९१४९ ही बोरीवली ते वलसाड दरम्यान धावणारी गाडी अंशतः रद्द करण्यात आली असून डहाणू ते वलसाड दरम्यान सुरळीत असणार आहे.

९३००७ चर्चगेट डहाणू रोड जाणारी गाडी पालघर पर्यंत धावणार असून पालघर ते डहाणू रोड पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर पालघर वरून ही परत चर्चगेट येथे जाणार आहे. तर ९३००९ ही चर्चगेट ते डहाणू आणि ९३०१२ ही डहाणू रोड ते विरार धावणारी गाडी पालघर ते डहाणू पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच माल गाड्या नियंत्रित केल्या जाणार असल्याचे पश्चिम रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सततच्या ब्लॉकमुळे नागरिकांचे हाल

मागील आठवड्यात देखील या कामी ब्लॉक घेण्यात आला होता. रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल आणि गर्डर टाकण्याच्या कामामुळे घेण्यात येत असलेल्या सततच्य ब्लॉकमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रविवारी अनेक कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे रेल्वे प्रवासी संख्या कमी असली तरीही इतर कामगारांचे मात्र या दरम्यान हाल होतात. तसेच सुट्टी निमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना देखील या ब्लॉकचा नाहक त्रास सहन करावा लागतो.