पालघर : पालघर नगर परिषद हद्दीतील अल्याळी मानशेठवाडी वृक्षतोड परवानगी प्रकरण मुख्याधिकारी यांना चांगलेच भोवणार आहे. महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाच्या (शहरी) अधिनियमांची पायमल्ली करून वृक्षतोडीसाठी नियमबाह्य प्रक्रिया राबवून परवानगी दिल्यामुळे पालघर नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्यासह पर्यावरणमंत्री व विविध स्तरांवर तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मानशेठवाडी येथील पाच एकर जमिनीमध्ये एका विकासकामार्फत विकासाचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी २८ मार्च रोजी त्या जमिनीवरील झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज नगर परिषदेकडे करण्यात आला. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी आवारे यांनी अति तातडीची बैठक घेऊन इतर प्रस्तावांसह या प्रस्तावाला मंजुरी देत परवानगी दिली.
न्यायालयीन प्रकरण सुरू असतानाही या प्रकरणामध्ये मुख्याधिकारी यांनी इतकी तत्परता कशी दाखवली असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अवघ्या चार दिवसांत वृक्षतोडीसाठी परवानगी दिली गेली आहे.
ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याने प्रभारी मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी नियमबाह्य काम करून पदाचा गैरवापर केल्याचे आरोप नगरसेवक भावानंद संखे यांनी केला आहे. या विरोधात आपणही पत्रव्यवहार करणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी लावावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मानशेठ वाडी येथील ज्या जमिनीवर वृक्ष तोडण्यासाठी वैभव आवारे यांनी परवानगी दिली आहे. त्याच जमिनीवरील वृक्ष गणना करण्याचे काम त्यांनी२०१५ मध्ये मुख्याधिकारी असताना केलेले आहे. त्या वेळी या जमिनीवर किती वृक्ष आहेत याची इत्यंभूत माहिती आवारे यांनीच अर्जदार यांच्या अर्जावरून दिली आहे. वृक्षतोडीची परवानगी देताना मागील कोणताही अहवाल न तपासता त्यांनी ही परवानगी दिली कशी असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्याधिकारी यांनी आर्थिक संबंधातून व्यवहार नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे वृक्षतोड परवानगी प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पर्यावरण राज्यमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे.-सचिन पाटील, माजी नगरसेवक, पालघर नगर परिषद

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’