scorecardresearch

पालघरमध्ये ‘आयटी इनोव्हेशन लॅब’ची स्थापना

जीवन विकास शिक्षण संस्था हा उपक्रम राबविणार आहे. या अत्याधुनिक संगणक कक्षाचा लाभ पालघर परिसरातील विद्यार्थी, तरुणांना होणार आहे.

पालघर : पालघरसारख्या भागातील विद्यार्थ्यांनीही तंत्रस्नेही व्हावे, त्यांच्यातील प्रयोगक्षमतेला वाव मिळाला, या उद्देशाने जिल्ह्यातील पहिली अत्याधुनिक तंत्रस्नेही ‘आयटी इनोव्हेशन लॅबोरेटरी’ रोटरी क्लब ऑफ मुंबई व रोटरी क्लब पालघर यांच्यामार्फत सुरू केली आहे. जीवन विकास शिक्षण संस्था हा उपक्रम राबविणार आहे. या अत्याधुनिक संगणक कक्षाचा लाभ पालघर परिसरातील विद्यार्थी, तरुणांना होणार आहे.

पालघरच्या श्री.स.तु. कदम विद्यालयात उभारलेल्या इनोव्हेटिव्ह लॅबचा खर्च योगेश महांसरिया यांच्या देणगीतून करण्यात आला असून सुमारे ५० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून अत्याधुनिक कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. १५०० चौरस फुटांच्या कक्षात उभारलेल्या या उपक्रमामध्ये रोबोटिक्स, थ्री डी पिंट्रिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT), डेटा सायन्स असे सहा महिने कालावधीचे अभ्यासक्रम शिकवले जाणार असून शालेय विद्यार्थ्यांसाठी ते विनामूल्य असतील. या कक्षाचे उद्घाटन १३ फेब्रुवारीला करण्यात आले. त्या वेळी रोटरी क्लब मुंबईचे अध्यक्ष शरणाज वकील, डिस्टिक गव्हर्नर इलेक्ट्रिक संदीप अग्रवाल, प्रकल्प समन्वयक भगवान पाटील, जीवन विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वागेश कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, रोटरी क्लब, इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. येत्या वर्षांत पालघर जिल्हा व मुंबई येथे अशा प्रकारच्या २५ प्रयोगशाळा उभ्या करण्याचा मानस आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Establishment it innovation lab palghar student knowledge ysh