पालघर : महामार्गावरील मध्यभागातून वळण घेण्यासाठी ठेवण्यात येणारे कट्स  बंद करण्याचा अजब प्रकार महामार्ग प्राधिकरणाकडून  सध्या सुरू आहे. मात्र हे करत असताना कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे  महामार्गालगतच्या गावातील नागरिकांसह वाहनचालकांना मोठी गैरसोय निर्माण होत असून त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नुकतेच प्रसिद्ध उद्य्ोगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर महामार्गावर असलेल्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यावर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासन यांनी एकत्रित येऊन यावर उपाययोजना कराव्यात असे सुचवण्यात आले होते.  मात्र उपाययोजना न करता महामार्गावरील हे कट बंद करण्याचा घाट घातला जात असून त्याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांनाही होत आहे.  हे कट बंद करण्यासाठी वापरलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे दिसून येत असून त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा कारभारही चव्हाटय़ावर आला आहे.

pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

महामार्गावर घोडबंदर ते आछाड पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असलेली कट्स बंद करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. सद्य्स्थितीत दोन कट्स पूर्णपणे बंद केली आहेत तर इतर  बंद करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कट्स बंद करण्यासाठी उभारणयत आलेले कठडे  निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे वाहनाच्या धडकेने ते निखळून पडले आहेत.  पोलीस प्रशासनाने ही वळणे बंद करण्यास सांगितल्याचा दाखला प्राधिकरणाच्या ठेकेदारामार्फत दिला जात आहे. 

  महामार्ग प्रशासनाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून हे कट्स  बंद करण्यात येत असतील  तर  याआधी अनेक बेकायदा कट्स बंद करण्याची तत्परता का दाखवली नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  महामार्गावर असलेली पर्यायी व्यवस्था म्हणजेच सेवा रस्ते, भुयारी रस्ते, पादचारी उड्डाणपूल आदी व्यवस्था  अस्तित्वात नाही. तरीही हे कट्स बंद करण्याचा अट्टाहास का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.   बहुतांश धोकादायक कट्स ही गावाच्या परिसरात नसून महामार्गावर असलेल्या मोठमोठय़ा हॉटेल्स नजीक त्यांच्या फायद्यसाठी बनवली असल्याचे आरोप होत आहेत.

 हे कट्स बंद केल्यामुळे महामार्ग ओलांडण्यासाठी लगतच्या गावातील नागरिकांना व इतर वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे कट्स बंद केल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना इच्छीतस्थळी जाण्यासाठी दीडे ते तीन किलोमीटरचा अधिकचा पल्ला गाठावा लागेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तेव्हा आधी पर्यायी व्यवस्था उभी करा, नंतरच महामार्गावरील वळण घेण्यासाठी मध्यभागी देण्यात येणारे कट्स बंद करा, अशी  मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षेचा मुद्दा असल्याने ह कट्स बंद करणे आवश्यक आहेत. ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईल तसतसे हे कट्स बंद केले जातील, असे महामार्ग प्राधिकरणाच्या ठाणे कार्यालयातील एका जबाबदार अधिकारम्य़ाने सांगितले आहे.

सायरस मेस्त्री यांच्या अपघातानंतर प्रशासनाला जाग

चारोटी ग्रामपंचायत हद्दीमध्ये महामार्गावरील एशियन पेट्रोल पंप वळण हे अपघाती व अतिधोकादायक असल्याने हे वळण बंद करून पर्यायी व्यवस्था उभारण्यात यावी असे पत्रव्यवहार व ग्रामपंचायतीचे ठराव चारोटी ग्रामपंचायतने सन २०१६, २०१८, २०२१ मध्ये महामार्ग प्राधिकरणासह महामार्गशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणांना दिले होते. त्यावेळी महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही. मात्र आता सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर सुरक्षेचा मुद्दा समोर करून वळण बंद केले जात आहे. म्हणजेच सर्वसामान्य माणसाच्या जिवाला किंमत नसल्याचे महामार्ग प्राधिकरण दाखवत असल्याचे आरोप होत आहेत. 

महामार्गावरील बंद होणारे कट्स

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर मनोर पोलीस ठाणे हद्दीतील वाडा खडकोना, शिमला हॉटेल जव्हार फाटा, मालजीपाडा हालोली असे कट्स देण्यात आले आहेत. तसेच चारोटी वाहतूक पोलीस चौकी अंतर्गत शिवम मोटर्स वडवली तर कासा पोलीस ठाणे अंतर्गत येणारी सास्वंद-धुंदलवाडी, अंबोली-आराम हॉटेल, शेर ए पंजाब हॉटेल, एशियन पेट्रोल पंप-चारोटी तसेच तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत आछाड काजळी, वरवाडा डोंगरी पाडा  येथे जाण्यासाठी   कट्स  देण्यात आले आहेत. ते टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहेत.  महामार्गावर सायरस मिस्त्री यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या तीनशे मीटर परिसरामध्ये महामार्गावर एक कट बंद  करण्यात आले आहे तसेच सोमटा येथेही बंद करण्यात आलेले आहे.