बोईसर: दमण बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणण्यासाठी तस्करांकडून विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. अशाच एका घटनेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेतून करण्यात येणारी दारूची तस्करी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी उघडकीस आणली. या कारवाईत जवळपास नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईची कुणकुण लागताच रुग्णवाहिकेचा चालक पसार झाला आहे. प्रकरणी दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दमन बनावटीच्य दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गुरुवारी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वाडा खडकोना येथील स्वागत हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभे असलेल्या संशयित रुग्णवाहिकेची तपासणी केली असता आतमध्ये बनवलेल्या विशेष कप्प्यांमध्ये दारूचा ३४ बॉक्स चा साठा आढळून आला. दारू व रुग्णवाहिका असा जवळपास नऊ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची कुणकुण लागताच चालक रुग्णवाहिका सोडून आधीच पसार झाला होता. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

हेही वाचा… पालघर शहरात हवेचा दर्जा घसरला; अनेकांना श्वसनासंबंधित त्रास

हेही वाचा… डहाणू नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या आंबेडकर नगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

ही कारवाई पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पांडुरंग पडवळ व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.