बोईसर स्थानकात फलाटावर जाण्यासाठी रेल्वे रुळांचा वापर; हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात

पालघर : बोईसर रेल्वे स्थानकात इच्छीत स्थळी तसेच कामावर वेळेत पोहोचण्याच्या घाईत असणारे हजारो प्रवासी तसेच कामगार लोकल गाडय़ा पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून फलाटावर जात असतात. येथे पूल आहे परंतु तो गैरसोयीचा असल्याने प्रवासी ही जोखीम पत्करत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे येथे सोयीचा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बोईसर येथे औद्योगिक वसाहती असल्यामुळे दररोज किमान १५ ते २० हजार कामगार वेगवेगळ्या ठिकाणाहून दररोज येथे प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या गाडय़ा बोईसर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन व तीनवर थांबत असतात. या स्थानकातील उत्तरेकडील जुना पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्या दिशेने बांधलेला नवीन पूल गैरसोयीचा  आहे. त्यामुळे बोईसर येथे उतरणाऱ्या सर्व प्रवाशांना पष्टिद्धr(१५५)मेच्या बाजूस येण्यासाठी एकमेव उताराचा पुलावरून प्रवास करणे भाग पडत आहे. त्या अरुंद पुलावरून प्रवास करताना विलंब होत असल्याने  जीव धोक्यात घालून  कामगार हे रेल्वे रूळ ओलांडून पश्चिमेच्या बाजूला पोहोचत असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवासी संघटनांनी याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे कैफियत मांडली होती. विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.   त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पादरम्यान बोईसर रेल्वे स्थानकातील ही समस्या सोडवण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने त्यावेळी घेतली होती. परंतु हा प्रकल्प पूर्ण होण्यास किमान तीन-चार वर्षांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत बोईसर, तारापूर बरोबर येणाऱ्या  कामगारांना  जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोईसर स्थानकातील गैरसोयी

  • बोईसर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वापी, उंबरगाव, बोर्डी, डहाणू, वाणगाव तसेच पालघर, केळवा रोड, सफाळा, वसई— विरार व मुंबई उपनगरातून मोठय़ा प्रमाणात कामगार दैनंदिन प्रवास करतात.
  • कामावर जाताना किंवा घरी परतताना पादचारी पुलाची आखणी गैरसोयीची असल्याने अनेकदा रेल्वे पूल ओलांडण्याची वेळ कामगार वर्गावर ओढावते. यामध्ये महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे.
  • बोईसर रेल्वे स्थानकात दक्षिणेच्या बाजूला असणारा पदाचारी पुल निमुळता व अरुंद असल्याने त्यावरून फलाट ओलांडण्यास खूप अवधी लागतो. रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी असणारा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला असून उत्तरेच्या बाजूला असलेला पूल मुख्य स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून दूरवर असल्याने त्याचा कामगार वर्ग वापर करताना दिसून येत नाही.