वसई- पश्चिम रेल्वेतर्फे विरार आणि बोरीवली दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे भूसंपादन केले जाणार असून या कामामुळे ५ गावे बाधित होणार आहे. मात्र या भूसंपादनासाठी कुठलीही हरकत आणि सूचना प्राप्त न झाल्याने भूसंपादन प्रक्रिया सुरू करत असल्याने रेल्वेने प्रसिद्ध केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत रेल्वेने अंधारात ठेवून आम्हाला माहिती दिली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. रेल्वेच्या या भूमिकेविरोधात स्थानिक एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्णय घेत आहे.

पश्चिम रेल्वेवरील विरार-बोरिवलीदरम्यान नव्याने ५ आणि ५ क्रमांची मार्गिका टाकली जाणार असून ३० ट्रॅकचे यार्ड तयार केले जाणार आहे. यामुळे वशई पश्चिमेकडील उमेळे, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर आणि नवघर या गावातील घरे बाधित होणार आहेत. यामध्ये जवळपास ७५ वर्षांपूर्वीचे चर्च, १०३ वर्षांपूर्वीचे देऊळ आणि जवळपास १०० वर्षांपूर्वीची घरे बाधित होणार आहेत. दुसरीकडे वसई स्थानक, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर येथील अनेक इमारतीही बाधित होणार असून त्याचा फटका येथील नागरिकांना बसणार आहे. याबाबत भूसंपादनासाठी जाहिरात काढण्यात आली होती. मात्र त्याची माहिती स्थानिकांना नव्हती. परंतु त्याबाबत येथील नागरिकांना कोणती माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेल्वेने मात्र या भूसंपादनाच्या जाहिरातीवर एकही हरकत न आल्याने याठिकाणी आता भूसंपादनाचे काम हाती घेण्याबाबत जाहिराती प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी एकत्र येत याविरोधात लढा देण्याचे जाहीर केले आहे.

Voting through EVM still delay in counting
नागपूर : ईव्हीएमद्वारे मतदान, तरीही मोजणीला विलंब होणार?
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

हेही वाचा – नाशिक : आठव्या दिवशी शेतकरी आंदोलन स्थगित, तीन महिन्यात मागण्यांची पूर्ती करण्याचे आश्वासन

रेल्वेने अंधारात ठेवल्याचा आरोप

एवढी मोठी प्रक्रिया करायची आहे तरी स्थानिकांना विश्वासात घेतले नाही. एवढेच नव्हे तर माहिती देखील दिली नाही असा स्थानिकांचा आरोप आहे. अचानकपणे रेल्वेने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे त्याची माहिती २७ फेब्रुवारी रोजी रेल्वेने वर्तमनापत्रात जाहिरातीद्वारे कळवली. मात्र त्याआधी आम्हाला कुठलीच माहिती देण्यात आली नव्हती असे उमेळा गावातील ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत उमेळे गाव बचाव समिती आक्रमक झाली असून याविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी समितीच्या शिष्टमंडळाने वसई प्रांतअधिकाऱ्यांची भेट घेऊन विरोध केला तर मंगळवारी रेल्वेच्या अधिकार्‍यांना भेटणार आहे.

रेल्वेने केलेल्या भूसंपादनाबाबत येथील नागरिकांना, महापालिकेला अथवा तहसील कार्यालयाला माहिती दिली नसल्याचे नायगाव येथील आशिष वर्तक यांनी सांगितले. रेल्वेने सातबाराच्या आधारे बाधित ग्रामस्थांची नावे जाहीर केली आहेत. मात्र इमारती आणि घरांमधील रहिवाशांना व्यक्तिशा कळवणे आवश्यक होते, असे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.

हेही वाचा – सरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन

रेल्वेने या कामाच्या प्रक्रियेला सुरवात केली असून त्याचा एक भाग म्हणून जुना अंबाडी पूल निष्काषित करण्यासाठी बंद केला आहे.