रानभाज्या वर्षभर मिळण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न; लागवडीसाठी रोपांची बंगळुरमधून आवक

पालघर: पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या वर्षभर उपलब्ध व्हावा यादृष्टीने जव्हार तालुक्यात करटोली या रानभाजीचे व्यापक प्रमाणात लागवड करण्याचा उपक्रम कृषी विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. बंगळुर येथून या वनस्पतीची १५०० रोपे मागवण्यात आली अजून त्याचे वितरण तालुक्यातील १०९ गावांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे.

पावसाळ्याच्या आरंभी करटोलीची वेल मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अवस्थेमध्ये वाढतात. कडवट चवीची ही रानभाजी अनेक आजारांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखी आहे. थंडी सुरू होईपर्यंत बाजारामध्ये करटोली ही भाजी मिळत असते. गुजरात राज्यात या भाजीची बारामाही शेती केली जाते. इतर हंगामात देखील परराज्यातील भाजी स्थानिक बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी येते. याच धर्तीवर जव्हार तालुक्यातील नागरिकाला वर्षभर या भाजीच्या माध्यमातून उत्पन्न मिळावे म्हणून करटोलीची रोप बंगळुर येथून आणली आहेत तालुक्यातील १०९ गावांपैकी ६२ गावांमध्ये या रोपांचे वितरण झाली आहेत,  असे तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी सांगितले.  तालुक्यात मोगरा व स्ट्रॉबेरीची लागवड यंदा देखील करण्यात येणार असून येथील शेतकऱ्यांना वर्षभर शाश्वात उत्पन्न मिळेल यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

औषधी उपयोग

  •  करटोली ही डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे.
  •  रक्तांशात कंदाचे चूर्ण देतात. मधुमेह, मूतखडा, सर्व प्रकारची विषबाधा,त्वचारोग, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात.
  • करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्रााव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे.   बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यासाठी गुणकारी.
  •  अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास, डोळ्यांचे आजार,- सर्दी, खोकला, ताप या  विकारांवर  पोषक
  •  मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते,

रानभाजी महोत्सव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरात मिळणाऱ्या रानभाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करून ते दैनंदिन सेवनात यावेत यासाठी डेंगाची मेट या ठिकाणी आज कृषी विभागाकडून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या चविष्ट पदार्थांच्या जिल्ह्याातील नागरी भागांमध्ये प्रसार भावा तसेच रानभाजी सेवनाला प्रोत्साहन मिळावे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. ठाणे येथे रविवारी झालेल्या रानभाजी पाककृती स्पर्धेत जव्हार येथील एका बचत गटाला पुरस्कार प्राप्त झाला आहे.