पालघर : गेल्या महिन्याभरापासून पालघर तालुक्यातील केळवे व माहीम या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. गेले काही दिवस बिबट्याचे दर्शन झाले नसताना काल शिरगाव परिसरात बिबट्याच्या वावर दर्शवणारे ठसे दिसून आले आहेत.
गेल्या महिन्याभराच्या कालावधी बिबट्या हा प्रथम केळवे गावात वावरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाले होते. पुढील काही दिवसात माहीम पिंपळ बाजार येथे बिबट्या रस्ता ओलांडा काही नागरिकांनी बघितले होते. त्यानंतर माहीम (हालोडी) परिसरात बिबट्या ने दोन बछड्यांना जन्म दिल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात परिसरात वावरताना नागरिकांच्या मनामध्ये भीती चे वातावरण होते.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्या चा वावर दिसून न आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. असे असताना शिरगाव व उसबाव दरम्यानच्या खाजण जमीन परिसरात बिबट्याचा वावर दर्शवणाऱ्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्या पालघर तालुक्यात किनारपट्टीच्या भागात वावर नियमितपणे करत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बिबट्याने भक्ष केल्याच्या घटना अजूनही पुढे आल्या नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असून नागरिकाने दक्षता बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.