पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकाने रंगे हात पकडले आहे.

एका कनिष्ठ अधिकाऱ्यां विरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल असून त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचे सांगत ही रक्कम तडजोडी नंतर दीड लाख करण्यात आली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तशी तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा व पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप व त्यांच्या पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला. तडजोड केलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये रोख रकमेची लाच घेताना आज संध्याकाळी पाच च्या दरम्यान दोघांनाही रंगेहात अटक केली आहे.

या दोघांनाही रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक  स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकाने ही कारवाई केली.