पालघर: पालघर तालुक्यातील उमरोळी व जवळपासच्या भागात चोरीच्या अनेक घटना घडल्या असताना रात्रीच्या वेळी संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली याप्रकरणी एकाचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी तीन ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे.

उमरोळी, सरपाडा व परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या अनेक घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट रोजी उमरोळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरत असणाऱ्या रमेश कलबहादूर भंडारी (३२) प्रशांत मिश्रा व चंदन मिश्रा या तिघांना गावकऱ्यांनी ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली. हे तिघेही बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर लोहमार्ग पोलीसां नी बोईसर येथे प्रथमोपचार करून गुजरात राज्यातील वलसाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपचारादरम्यान रमेश भंडारी यांचा ६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्यानंतर. हे प्रकरणात पालघर पोलिसांकडे नोंद होऊन नंतर कारवाई साठी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी सरपाडा परिसरातील विनोद पाटील, प्रफुल्ल घरात व कुणाल राऊत यांना अटक केली असून त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात इतर आरोपींचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.