डहाणू : डहाणू, चिखला येथे तटरक्षकाची भरती परीक्षा देण्याकरिता उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली व अन्य असे विविध राज्यातून २०० हून अधिक  परीक्षार्थींनी चिखला येथे अंतर नियम  न पाळता गर्दी केल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले.

भरतीची कोणतेही कल्पना नसल्याने स्थानिक  मात्र तटरक्षकाच्या पदासाठी वंचित राहिल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. या  बाबत तहसीलदारांना विचारले असता तटरक्षक दलाचे कमांडर यांच्याकडून माहिती घेत असल्याचे त्यांनी  सांगितले.

डहाणू तालुक्यातील चिखला येते तटरक्षक दलाचे आस्थापना आहे. तटरक्षक दलाच्या विविध पदाच्या भरतीसाठी सोमवारी  परराज्यातून तरुणांनी हजेरी लावल्याने स्थानिक तरुणांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला विचारणा केली असता भरती प्रक्रीया सुरु असल्याचे सांगितले.

स्थानिक तरुणांना या भरतीबाबत कल्पना नसल्याने नाराजी व्यक्त केली. करोना चाचणी तसेच आररटीपीसीआर नसताना परराज्यातून  भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून करोना संसर्ग पसरण्याची भिती स्थानिकात आहे.