पालघर : पालघर जिल्ह्यातील पशुपालकांना दूध उत्पादन, शेतीपूरक व्यवसाय व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
पालघर जिल्ह्यात तीन लाख 8 हजार 637 गाई म्हशी व एक लाख 17 हजार शेळ्या मेंढ्या तसेच 25 लाखांच्या जवळपास कोंबड्या आहेत. पशूंच्या संवर्धनाकरिता पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांतून दुधाळ गायी-म्हशी गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या पालनासाठी शेड उभारणीस अनुदान, १०० एकदिवसीय कुक्कुट पक्ष्यांचे वाटप हे लाभ दिले जाणार आहेत. या योजनांचे अर्ज २ मे ते 5 जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. त्यानंतर कागदपत्रांची अपलोड करण्याची मुदत ८ जून ते १५ जून पर्यंत आहे.
या योजनेकरिता तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पंचायत समितीच्या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज, दस्तावेज सादरीकरण व योजनेबाबत मार्गदर्शन करतील. या अधिकाऱ्यांची संपर्क माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागावरही लावण्यात आली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरण्याचे आवाहन
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थेमध्ये संगणक, प्रिंटर, इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना बाहेरून हे अर्ज भरावे लागत आहेत. याकरिता लाभार्थ्यांकडून खाजगी सायबर कॅफे आवाजवी शुल्क आकारत आहेत. ज्यामुळे गरीब, आदिवासी लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र ग्रामपंचायत स्तरावर संगणक, प्रिंटर, इंटरनेट सुविधा तसेच अर्ज भरण्यासाठी डाटा ऑपरेटर या सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन खात्याच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय ऑनलाइन योजनाचे पालघर जिल्ह्यातील अर्ज भरून देण्यासाठी आवश्यक ती मदत गरजू पशुपालकांना ग्रामपंचायत स्तरावरून करावी. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गरीब, आदिवासी लाभाथ्यांना सदर सेवा निशुल्क दरात उपलब्ध होईल. व जास्तीत जास्त अर्ज लाभार्थ्यांकडून भरले जाऊन जिल्ह्याचे योजनानिहाय लक्षांक पूर्ण होण्यास देखील हातभार लागेल अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
योजना, पात्रता आणि प्रक्रिया याविषयी अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट द्यावी. तसेच पशुसंवर्धन विभागाचा क्रमांक 1962 (सोमवार ते शनिवार, सकाळी 7 ते सायंकाळी 6) वर संपर्क साधावा. इच्छुक लाभार्थ्यांनी http://www.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरवरील ‘AH-MAHABMS’ या मोबाईल अॅपद्वारे अर्ज सादर करावा – डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
नोडल अधिकारी यांचे संपर्क क्रमांक
जिल्हा नोडल अधिकारी:
डॉ. सोनिया चव्हाण : 9960856406
तालुका नोडल अधिकारी:
1.वसई :
डॉ. नकुल कोरडे : 9768366620
स्मिता गायकवाड : 7387311153
2.पालघर :
डॉ. राहुल संखे : 8007071944
डॉ. नेहा माळी : 860078457
- डहाणू :
संदेश सुकाळे : 7875301574
स्वप्नाली शिंदे : 7000151881 - तलासरी :
भूषण मयेकर : 9421633013
कुणाल दळवी : 7021952290 - विक्रमगड :
डॉ. अंशुमन कारले : 9420912384
श्री. प्रवीण दिघे : 7875305875 - वाडा :
डॉ. नितीन लवटे : 8108235319
गीता मुकणे : 9156790088 - मोखाडा :
डॉ. सचिन भालचिम : 9922417373
परमेश्वर पोटे : 9890753631 - विक्रमगड :
डॉ. जयकुमार सातव : 9423124827
विनायक भोये : 8097432881