पालघर : केळवे गावातील वर्तक पाखाडी भागात काल (ता १३) रात्री १० वाजल्याच्या सुमारास बिबट्याचा वावर असल्याचे एका घरामध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. हे वृत्त गावामध्ये पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वर्तक पाखाडी व करंदाळी दरम्यान राहणारे हार्दिक सावे यांच्या घरी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये काल रात्री १० वाजल्याच्या सुमारास बिबट्या चा वावर दिसला. ही माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी वनविभागाला सूचित केले. त्यानंतर पोलीस, वनविभाग, प्राणी मित्र यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. बिबट्याच्या वावराचे ठसे काही ठिकाणी दिसून आले असले तरी रात्रीच्या अंधारात व पडणाऱ्या पावसात बिबट्या परिसरातून आढळून आला नाही.

केळवे गावातून दररोज पहाटे कामानिमित्ताने ३०० – ४०० नागरिक पहाटच्या रेल्वे गाड्या पकडण्यासाठी मोटरसायकल, बाईक, रिक्षा व राज्य परिवहन मंडळाच्या बसली जात असतात. आपल्या वाहनाच्या प्रतीक्षेत त्याला रस्त्यावर काही काळ थांबवावे लागत असते. शिवाय या परिसरात तयार होणारा भाजीपाला सकाळी ५३० च्या सुमारास केळवे बाजारात आणून त्याची विक्री करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय अजून शाळकरी विद्यार्थी व वाडी व आळ्या मध्ये दुरुवर वसलेल्या घरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.