पालघर : देशातील आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यावर केंद्र व राज्य सरकारने भर दिला आहे. मात्र देशभरात धावणारी रेल्वे डिजीटल प्रणालीत अद्याप काहीशी मागे आहे. तिकीट बुकींग प्रणाली डिजीटल झाली असली तरी विनातिकीट प्रवाशांकडून दंडांची रक्कम वसुली करण्यासाठी अद्यावत प्रणाली अद्यााप कार्यरत न झाल्याने त्रयस्थ व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे.

नोटबंदी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर करून ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर १९ मे २०२३ नंतर दोन हजार रुपये किमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. यामुळे उद्भविलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी डिजिटल स्वरूपात व्यवहार केले जावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यास घेतले आहे.

Karjat Railway Station
Karjat कर्जत रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Finance Ministry
Finance Ministry : वित्तमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटी, डीपसीक आदी AI च्या वापरास मज्जाव, कारण काय?
indian railways viral video argument between tte and passenger
टीटीईने व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाला सांगितला भलताच कायदा; “सात वर्षांचा तुरुंगवास अन्….”, पाहा संतापजनक VIDEO
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

बेस्ट, राज्य परिवहन मंडळ व इतर संस्थाने प्रवाशांकडून डिजिटल स्वरूपात भाडे अथवा दंड स्वीकारण्याची पद्धती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेकडूनही तिकिटाचे बुकिंग करण्यासाठी डिजिटल पद्धती अवलंबिली जाते. तरीही विनातिकीट अथवा दुसऱ्या दर्जाचे तिकीटावर प्रथम वर्गातून किंवा अधिकृत तिकिटाशिवाय वातानुकूलित गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसुली करताना पश्चिम रेल्वेकडे दंड रक्कम भरण्यासाठी डिजिटल प्रणाली कार्यरत नाही. हे पालघरमध्ये घडलेल्या एका प्रकारावरून उघडकीस आले आहे. यामध्ये विशेष म्हणजे दंडात्मक रकमेची वसुली करताना संबंधित तिकीट तपासणीस स्वत:च्या अथवा अन्य रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावे दंडाची रक्कम जमा करून घेण्याऐवजी त्रयस्थ व्यक्तीच्या नावे पैसे जमा करत असल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-पालघर : पाच मिनिटांच्या उशिराकरिता ५० उठाबशा, तीन दिवसांपासून दहावीतील विद्यार्थिनी रुग्णालयात

या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्रयस्थ व्यक्तीच्या नावे असणाऱ्या क्यूआर कोडद्वारे दंडात्मक रक्कम गोळा केली जात असली तरीही प्रवाशाला दंडाची पावती दिली जाते आणि वसूल केल्या जाणाऱ्या रकमेचा पूर्ण भरणा रेल्वेकडे होतो. तपासणी कर्मचाऱ्यांकडे रेल्वेचा अधिकृत क्यूआर कोड जरी नसला तरी या पर्यायी व्यवस्थेने गैरप्रकार होणे शक्य नाही, असे कर्मचाºयांनी स्पष्ट केले आहे.

तर दंड वसुली करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडे रेल्वेचा क्यूआर कोड नसल्याचे जनसंपर्क विभागाने प्रथम दर्शनी मान्य केले आहे. या संदर्भात अधिक चौकशी करून माहिती देऊ असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले आहे.

तडजोडी दरम्यान गैरप्रकार ?

अनेकदा तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडल्यानंतर दंड भरण्यासाठी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रक्कम नसल्याचे सांगितले जाते. अशा प्रवाशांना पुढील स्थानकात तपासणी कर्मचारी फलाटावर उतरवून तडजोड करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी त्रयस्थ व्यक्तीच्या नावे डिजिटल पेमेंट करून गैरप्रकार घडत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते.

आणखी वाचा-डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पावतीवर त्रयस्थ व्यक्तीचे नाव

पालघरमध्ये दंडात्मक रक्कम डिजिटल स्वरूपात त्रयस्थ व्यक्तीच्या नावे अदा करण्यास एका प्रवाशाने नकार दिला होता. कारण त्याला देण्यात आलेल्या दंडाच्या पावतीमध्ये ज्याच्या नावे डिजिटल प्रणालीद्वारे रक्कम जमा होते. त्या त्रयस्थ व्यक्तीचे नाव उल्लेखित करण्यात आले होते. मात्र ३० ते ४० टक्के दंड भरणारे प्रवासी रेल्वेशी संबंधित नसणाऱ्या एखाद्याा खात्रीशीर व्यक्तीच्या नावे पैसे भरणा करताना त्यांच्या पावतीवर असे उल्लेख होत नसल्याचे दिसून आले आहे. ज्या व्यक्तीच्या नावे दंडाची रक्कम जमा केली जाते. ती व्यक्ती नंतर संबंधित तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला रोखीने पैसे देते. पुढे त्याचा भरणा रेल्वेच्या तिजोरीत होतो. पर्याय म्हणून सद्याा अशी प्रणाली कार्यरत आहे. एकंदरीत पश्चिम रेल्वेच्या दंडवसुली प्रणालीतील कच्चे दुवे पालघरच्या प्रकारामुळे उघडकीस आले आहेत.

Story img Loader