१०० मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी २०० शिक्षकांची आर्थिक मदत 

नीरज राऊत

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

पालघर :  जुलै महिन्याच्या अखेरीस चिपळूण व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्धवस्थ झालेले कुटुंब पुन्हा उभे राहण्यासाठी  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात करण्यात आला. परंतु या पूरग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा आर्थिक हातभार अपुराच राहिला आहे. त्यासाठी पालघरमधील २०० शिक्षकांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला असून आर्थिक मदत देऊन १०० मुलींचा रखडलेला महाविद्यावयीन प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावला आहे. 

चिपळूण परिसरात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीने उद्ध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभारण्यासाठी शासनाने तसेच सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असला तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मदत अपुरीच पडत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत घर-संसाराच्या पुनर्रउभारणीच्या आर्थिक विवंचनेत सापडलेली कुटुंबे मुलांच्या शिक्षणाला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे.   विशेषत: यामध्ये मुलींचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची समस्या गंभीर असल्याचे आढळून आले  आहे. पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पूरग्रस्तांसाठी प्राध्यापकांच्या संघटनेमार्फत सढळ हस्ते मदत केल्यानंतरदेखील पालघरच्या २०० प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन सव्वा लाख रुपयांची रक्कम गोळा केली आहे. ही संकलित केलेली रक्कम चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आली असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या व विशेषत: मुलींच्या शैक्षणिक प्रवेशासाठी ही रक्कम वापरावी अशी विनंती त्यांनी  केली आहे. तीन हजार विद्यार्थीसंख्या असणाऱ्या महाविद्यालयात ३० ते ४० टक्के पात्र विद्यार्थ्यांनी अजूनही पुढील वर्गामध्ये प्रवेश घेतला नाही  या रकमेच्या माध्यमातून किमान १०० मुलींचा प्रवेशाची समस्या मार्गी लागणार आहे. पूर परिस्थितीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीयांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ  नये म्हणून पालघर महाविद्यालयाने उचललेले पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे 

पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शैक्षणिक शुल्क भरण्यास रक्कम रक्कम नाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता होती. हे लक्षात आल्यानंतर पालघर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी निधी संकलित करून तो डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण महाविद्यालयाला दिला आहे.  एका शैक्षणिक संस्थेने दुसऱ्या शैक्षणिक संस्थेला ‘साथी हाथ बढाना’प्रमाणे केलेली ही मदत आहे.

डॉ. किरण सावे,  प्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर