डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी गावच्या हद्दीत आज दुपारी (५ जानेवार) दुपारी झालेल्या प्रवासी वाहनाच्या भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाप्रमाणेच वाहनाच्या मागच्या आसनावर बसणाऱ्या या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.

डहाणू तालुक्यातून कडून गुजरात कडे दुपारी एक वाजल्याच्या सुमारास निघालेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली उतरून कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहन खड्ड्यात पडल्यानंतर २ ते ३ वेळा उलटून ५० मिटर लांब फेकले गेले आहे.

road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Rickshaw driver stopped for drink tea and died in accident on sion panvel highway
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
35 people injured in an accident where st bus fell from bridge near Tandulwadi
एसटी बस पुलावरून कोसळून ३५ जण जखमी, इस्लामपूरजवळ महामार्गावर अपघात

हेही वाचा >>> समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास

अपघाता दरम्यान वाहनाच्या पुढच्या बाजूला बसलेल्या पती-पत्नीने सीट बेल्ट लावल्याने ते जखमी झाले असून वाहनाच्या मागच्या आसनावर बसलेले व्याही (पती व पत्नी यांचे वडील) रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घिवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीला डबल डेकर डब्यांचा ४ जानेवारी अखेरचा दिवस

सायरस मिस्त्री यांच्याप्रमाणेच दोघांचे अपघाती निधन ४ सप्टेंबर २०२२ रोजी एका आलिशान गाडीमधून गुजरात येथून मुंबईकडे परतताना सायरस मिस्त्री यांच्या वाहना ने चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली होती. या अपघात समयी गाडीमध्ये मागच्या आसनावर बसलेल्या सायरस मिस्त्री व जहांगीर पांडोल हे अपघाता दरम्यान आपटले गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता.

Story img Loader