नीरज राऊत
अंमली पदार्थ विक्री प्रकरणात वसई क्राईम ब्रँच युनिटनने विरार येथून एका तरुणाला पकडल्यानंतर त्या प्रकरणात चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस चौकीच्या हद्दीतून चिंचणी मांगेळआळी येथून दोघांना अटक केली आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणा-या समाज कंटकांवर कारवाई करुन त्यांना पायबंद करण्याबाबत वरिष्ठांकडून गुन्हें शाखेला सुचना देण्यात आल्या होत्या.
०१ डिसेंबर रोजी रात्री कक्ष-३, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत असताना मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दिमध्ये खराडतारा ब्रीजच्या खाली असलेल्या सव्हिस रोडवर कैलास जनार्दन तामोर (३६) या डहाणु, तालुक्यातील तरुणाला अंमली पदार्थ विक्री करताना पकडले. त्या वेळी त्याच्या कब्जामध्ये बाळगलेल्या १.१ किलो ग्रॅम बजानाच्या (११,००,०००/- रुपये किमतीच्या) चरस या अमली पदार्थासह ताब्यामध्ये घेण्यात आले. त्या अनुषंगाने मांडवी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला.वरील गुन्ह्याच्या तपासादरम्यान अधिक माहिती वरून आरोपी कैलास जनार्दन तामोरे याचे साथीदार संकेत विजय तामोरे (३२) आणि निकेश रमेश दवणे (३७) वर्षे, दोघेही राहणार चिंचणी, (ता. डहाणु) यांना ताब्यामध्ये घेऊन त्यांच्या घरड्राडतीमध्ये एकूण ७.६५० किलो ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
या तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण ८.७५० किलो ग्रॅम वजनाचा ८६.१३.३५०/- रुपये किमतीचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कक्ष-३, गुन्हे शाखा, विरार मार्फत करण्यात येत असून, अटक आरोपी यांना ०७ डिसेंबर पर्यंत मा. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केली आहे. हे अंमली पदार्थ आरोपी यांनी कोठून आणला याबाचत अधिक तपास सुरु आहे.