कासा: मोखाडा तालुक्यातील एका आदिवासी गरोदर मातेच्या पोटात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर चार दिवसांनी मातेचा मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोखाडापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील देवबांध लगत आडोशी शिरसगाव (गणेशवाडी) येथील ही महिला असून आरोग्य विभागाने या बालक-माता मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

रुपाली भाऊ रोज (२५) हिला आठवा महिना सुरू असताना शनिवार १३ जानेवारी रोजी पोटात कळा सुरू झाल्यामुळे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र प्रसूती कळा आव्यश्यक प्रमाणात नसल्याने दिवसभर केंद्रात ठेऊन नंतर महिलेला घरी पाठविण्यात आले. १५ जानेवारीला सकाळी महिलेची प्रकृती बिघडल्याने खोडाळा येथून तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान बालकाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाला असल्याचे दिसून आल्याने तसेच मातेला इतर आजारांची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी या महिलेला तातडीने नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवीन्यात आले. त्याठिकाणी शस्त्रक्रिया करून मृत बालकाला पोटातून बाहेर काढण्यात आले. या महिलेवर नाशिक येथे उपचार सुरू असताना १९ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – पालघर: वाढवण बंदर जन सुनावणीचा सोपस्कार पूर्ण

हेही वाचा – शहरबात : पुढील सहा महिने वाहतूक कोंडीचे

या मृत्यूला खोडाळा येथील आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप मृत मातेचे पती भाऊ रोज यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोडाळा येथे घडलेल्या घटनेची चौकशी सुरू आहे. याठिकाणी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी