आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या गुणावर मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. ( सौजन्य : सर्व फोटो वर्षा उसगांवकर फेसबुक पेज) गोव्याच्या मातीत बालपण गेलेल्या या अभिनेत्रीने सौंदर्य आणि अभिनय यांची सांगड घालत प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं. किंबहुना आजही गाजवत आहे. मराठी कलाविश्वाला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने केवळ मराठीच नाही तर हिंदी, भोजपुरी, बंगाली, तेलुगू, राजस्थानी, कोकणी आणि छत्तीसगडी अशा आठ भाषांतील चित्रपटातून भूमिका करण्याचा विक्रम केला आहे. ‘गंमत जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘एक होता विदुषक’ ‘मुंबई ते मॉरिशस’, ‘मज्जाच मज्जा’, ‘माल मसाला’, ‘पसंत आहे मुलगी’ आणि ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ असे किती तरी चित्रपट गाजले. वर्षाचा आज कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र तिची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. विशेष म्हणजे वयाच्या ५२ व्या वर्षीही ही अभिनेत्री तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. तिच्याकडे पाहून कोणतीही तरुणी लाजेल असं तिचं सौंदर्य आणि फिटनेस आहे. वर्षा तिच्या फॅशनसेन्सकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतं. वर्षाला मांजर प्रचंड आवडत असून त्यांच्यासोबतचे बरेच फोटो तिने फेसबुकवर शेअर केले आहेत. वर्षा तिच्या फिटनेसकडे जातीने लक्ष देत असल्याचं दिसून येतं. वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केलं आहे. वर्षाच्या सासरच्या मंडळींचा संगीत क्षेत्राशी निकटचा संबंध आहे वर्षाला फिरण्याची आवड असल्याचं दिसून येतंय. ( सौजन्य : वर्षा उसगांवकर फेसबुक पेज) ( सौजन्य : वर्षा उसगांवकर फेसबुक पेज)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video