-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला.
-
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे.
-
मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाविषयी अनेक गोष्टी, पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.
-
‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारेने ‘पावनखिंड’ या चित्रपटात ‘श्रीमंत कोयाजी बांदल’ यांची भूमिका साकारली आहे.
-
“नावाचे बांदल आहोत, आम्ही जिंकत नाय तोवर लढाई संपणार नाय!” असं कॅप्शन देत अक्षयने हा फोटो शेअर केला आहे.
-
‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात अक्षयने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
अक्षय वाघमारेने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे.
-
‘बिग बॉस’ मराठी ३ या कार्यक्रमातून अक्षय वाघमारे हा पहिला स्पर्धक बाहेर पडला.
-
अक्षयने ८ मे २०२० रोजी डॅडींची मुलगी योगिता गवळीशी लग्न केले.
-
अक्षय व योगिता यांच्या घरात ७ मे २०२१ रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – अक्षय वाघमारे / इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या