
बॉलिवूडमधील लोकप्रिय ‘आलिया-रणबीर’ जोडीने १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

‘आलिया-रणबीर’ला चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

कपूर कुटुंबीय आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये पार पडला.

आलिया-रणबीरच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

लग्नात आलिया आणि रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले होते.(फोटो : House On The Clouds)

नवविवाहित ‘आलिया-रणबीर’ जोडी.

नुकतंच नववधू आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाही विवाहसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. (फोटो : House On The Clouds)

आलिया भट्टचा लग्नातील लूक.

आलियाने शेअर केलेला मांजरींसोबतचा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोला आलियाने ‘कॅट ऑफ ऑनर’ असं कॅप्शन दिलं आहे.

आलियाने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

(सर्व फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)