
कलाकारांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हा चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.

मग एखादा नवीन कलाकार असो अथवा दाक्षिणात्य सुपरस्टार.

आपल्या आवडत्या कलाकाराला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना पाहणं हा अनेक चाहत्यांसाठी सुखद धक्का असतो.

आता स्टार किड्सही बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.

आलिया भट्ट, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर या स्टार किड्सने बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करत अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो : सुहाना खान/ इन्स्टाग्राम)

‘द आर्चीज’ या चित्रपटातून सुहाना मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. (फोटो : सुहाना खान/ इन्स्टाग्राम)

सुहाना खानसोबतच या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातूदेखील झळकणार आहे. अगस्त्य नंदा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे.

दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांची मुलगी अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बॅनर’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. (फोटो : अलिजेह अग्निहोत्री/ इन्स्टाग्राम)

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दिग्दर्शक, निर्माता करण जौहरच्या चित्रपटातून इब्राहिम अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या इब्राहिम ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या करण जौहरच्या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहे. (फोटो : सारा अली खान/ इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

जान्हवीची छोटी बहीण खुशी कपूरदेखील लवकर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. (फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)

‘द आर्चीज’ या चित्रपटात खुशी कपूर सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. (फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची लेक रेने सेन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दिग्दर्शक करण जौहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटातून शनाया मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)