-
अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या कतरिना कैफचा आज ३९वा वाढदिवस आहे.
-
कतरिनाने चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
२००३ साली कतरिनाने ‘बुम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
या चित्रपटात कतरिनाने बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
-
परंतु, कतरिनाचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता.
-
‘सरकार’, ‘पार्टनर’, ‘जब तक है जान’, ‘एक था टायगर’ या बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
-
कतरिनाने ‘मल्लीस्वरी’ या दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे.
-
कतरिना बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
एका चित्रपटासाठी कतरिना १० कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना ३०६ कोटी संपत्तीची मालकीण आहे.
-
मुंबईत कतरिनाचे स्वत:च्या मालकीचे दोन फ्लॅट्स आहेत.
-
याशिवाय तिच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत.
-
रेंज रोवर, लॅंड रोवर, ऑडी क्यू ७, मर्सिडीज या लक्झरी कार कतरिनाकडे आहेत.
-
१० डिसेंबर २०२१ रोजी कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली.
-
लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यासाठी कतरिना आणि विकी कौशल मालदीवला गेले आहेत.
-
कतरिना ‘फोन बुथ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो : कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)

गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी